गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग, 500 डॉक्टरांचा एकाच वेळी भाजपमध्ये प्रवेश

 मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील  यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये डॉक्टरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपची ताकद आणखी वाढल्याचे बोलले जात आहे. 

    या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमधील सुमारे 500 डॉक्टरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.  मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील  यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये डॉक्टरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपची ताकद आणखी वाढल्याचे बोलले जात आहे.