हरियाणातील यमुनानगर येथे दोन ट्रक धडकून भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

हरयाणातील यमुनानगर येथील जगाधरी पोंटा साहिब राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात झाला. दोन ट्रकच्या धडकेनंतर त्यांना आग लागली आणि त्यात दोघे जिवंत जळाले. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    चंदीगड : हरयाणातील यमुनानगर येथील जगाधरी पोंटा साहिब राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात झाला. दोन ट्रकच्या धडकेनंतर त्यांना आग लागली आणि त्यात दोघे जिवंत जळाले. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    भीलपुरा गावाजवळ ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे ट्रक एकमेकांवर आदळले. अपघात इतका भीषण होता की, ट्रकला धडकताच पेट घेतला. आरडाओरडा ऐकून तेथे लोकांचा जमाव जमला. ट्रकला लागलेली भीषण आग पाहून लोकांनी अग्निशमन विभागाला अपघाताची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, तोपर्यंत ट्रकमधील दोन जण जिवंत जळून मरण पावले होते.

    काही जणांनी ट्रकमधून उड्या मारून आपला जीव वाचवला. अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीमुळे ट्रकही जळून खाक झाला.

    ओव्हरटेक करताना अपघात

    अपघाताचे कारण ट्रकचे ओव्हरटेकिंग असल्याचे सांगण्यात येत आहे. समोरून एक ट्रक जात असताना दुसऱ्या ट्रक चालकाने त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला पण नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.