ना आईची हत्या केल्याचा पश्चात्ताप ना शिक्षेची भीती, ‘त्या’ मुलाचं बोलणं ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

एका १६ वर्षीय मुलाने ४ जूनला वडिलांच्या पिस्तुलने आईची गोळ्या घालून हत्या केली होती. यानंतर (Crime) बालसुधारगृहात पाठवण्यात आल्यानंतर मुलाने तेथील मुलांशी बोलताना आईची हत्या (Son Murdered His Mother) केल्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगितलं आहे.

    लखनऊनध्ये पब्जी खेळण्यास (Lucknow PUBG Murder) विरोध केल्याने मुलाने आईची हत्या करण्यात आली. याप्रकरणात आता नव्या गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. एका १६ वर्षीय मुलाने ४ जूनला वडिलांच्या पिस्तुलने आईची गोळ्या घालून हत्या केली होती. यानंतर मुलाला बालसुधारगृहात पाठवलं आहे. (Crime) बालसुधारगृहात पाठवण्यात आल्यानंतर मुलाने तेथील मुलांशी बोलताना आईची हत्या (Son Murdered His Mother) केल्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगितलं आहे.

    मुलाने दंडाधिकाऱ्यांसमोर सांगितलं की, “जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते. माझी त्या शिक्षेसाठी तयारी आहे. मी पिस्तूलने माझ्या आईची हत्या केली. त्यानंतर रात्रभर मित्रांसोबत पार्टीदेखील केली”.

    बालसुधारगृहातील कर्मचाऱ्याने सांगितलं की, “ मुलगा सुधारगृहात आल्यापासून चविष्ट जेवण देण्याची मागणी करत आहे. पोलिसांच्या चुकीमुळे आपण जेलमध्ये आहोत, असं तो म्हणत आहे. पण तो आपल्या गुन्ह्याची कबुलीदेखील देत आहे.”

    मुलाने पुढे म्हटलं की, “आपल्याला भीती वाटत नाही. जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होईल आणि त्यासाठी माझी तयारी आहे. मुलाने उत्तर दिल्यानंतर दंडाधिकारी संतापले आणि त्यांनी पोलिसांना रिमांड मागण्यास सांगितलं. यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

    मुलाच्या लहान बहिणीच्या मते, आईची हत्या केल्यानंतर तो रात्री दोन वाजता गाडीवरुन कोणाला तरी भेटण्यासाठी गेला होता. पोलिसांनी मात्र याबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. कुटुंबीय हत्येमध्ये चुकीच्या पद्धतीने मुलाला अडकवण्यात आल्याचा दावा करत आहे. कुटुंबीयांना पब्जीची खोटी गोष्ट रचली असल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या तपासावर आपण समाधानी नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

    मुलाने आपल्या मित्राला पाच हजारांची ऑफर देत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी धमकावलं होतं. पण त्याने नकार दिला होता. यानंतर मुलाने आपल्या मित्रांसोबत पार्टी केली. तसेच तो क्रिकेटदेखील खेळला. त्याची आई नेहमी यासाठी विरोध करत होती. मुलाने ७ जूनला आपल्या वडिलांना व्हिडीओ कॉल करत आईचा मृतदेह दाखवला होता. तसंच आईच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूलदेखील दाखवली होती.