इस्रोचं पु्न्हा एक यशस्वी पाऊल, आदित्य एल-१ नं सूर्याचा काढला फुल डिस्क फोटो!

इस्रोच्या आदित्य एल-१ या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेल्या या भारतीय दुर्बिणीने पहिली छायाचित्रे घेतली आहेत. सूर्याचे वातावरण तपशीलवार पाहण्यासाठी अकरा वेगवेगळ्या फिल्टरचा वापर करण्यात आला.

  ISRO ने 2 सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून आदित्य-L१ (Aditya L1) अंतराळयान प्रक्षेपित केले. सूर्यमाला आणि सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन आदित्य सुरू करण्यात आले आहे. काही दिवसापुर्वी आदित्य-L१ च्या सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट’ हा पेलोड कार्यरत असल्याचं सांगण्यात आलं आता पुन्हा या संदर्भात आता इस्रोकडून मोठी अपडेट आली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेल्या दुर्बिणीने पहिली छायाचित्रे घेतली आहेत. सूर्याचे वातावरण तपशीलवार पाहण्यासाठी अकरा वेगवेगळ्या फिल्टरचा वापर करण्यात आला. इस्रोने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये सनस्पॉट्स, प्लेज एरिया आणि शांत सूर्य दिसू शकतो.

  आदित्य-L1 ने आपल्या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT) ने ही छायाचित्रे घेतली. याने अतिनील तरंगलांबीवर सूर्याची पहिली पूर्ण-डिस्क छायाचित्रे घेतली. शुक्रवारी इस्रोने ट्विटरवर छायाचित्रे पोस्ट करून याची घोषणा केली. सूर्याच्या अभ्यासातील एक मैलाचा दगड म्हणून त्याचे वर्णन केले आहे.आदित्य-एल1 ने 200 ते 400 नॅनोमीटरपर्यंतच्या तरंगलांबीचा वापर करून छायाचित्रे घेतली आहेत. यामुळे सूर्याचे प्रकाशमंडल आणि क्रोमोस्फियरची नवीन माहिती मिळेल. विविध सौर घटना समजून घेण्यासाठी हे स्तर महत्त्वाचे आहेत. यामध्ये सूर्याचे ठिपके आणि फ्लेअर्स प्रमुख आहेत. याचा पृथ्वीच्या हवामानावर परिणाम होऊ शकतो.

  SUIT ने पहिला फोटो 6 डिसेंबर 2023 रोजी घेतला

  आम्ही तुम्हाला सांगतो की आदित्य L-1 ची टेलिस्कोप SUIT पहिल्यांदा 20 नोव्हेंबर 2023 रोजी ऑपरेट करण्यात आली होती. त्याचा पहिला फोटो 6 डिसेंबर 2023 रोजी घेतला. ही दुर्बीण सूर्याच्या वातावरणाचे तपशीलवार निरीक्षण करण्यासाठी अकरा वेगवेगळ्या फिल्टरचा वापर करते. हे सनस्पॉट्स, प्लीटेड एरिया आणि शांत सूर्य यांसारखी वैशिष्ट्ये प्रकट करते. हे फिल्टर शास्त्रज्ञांना चुंबकीय सौर वातावरणातील डायनॅमिक कपलिंग आणि पृथ्वीच्या हवामानावर सौर किरणोत्सर्गाच्या प्रभावांचा अभ्यास करण्यास मदत करतात.

  2 सप्टेंबरला आदित्य L1 चं यशस्वीरीत्या लाँच

  ISRO ने 2 सप्टेंबर 2023 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारताचे पहिले सौर मिशन आदित्य L1 प्रक्षेपित केले. प्रक्षेपणासाठी PSLV-XL या रॉकेटचा वापर  करण्यात आला. सूर्यमाला आणि सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. आदित्य त्याचा प्रवास लोअर अर्थ ऑर्बिट (LEO) पासून सुरू करेल. त्यानंतर ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या म्हणजेच स्फेअर ऑफ इन्फ्लुएन्स (SOI) च्या बाहेर जाईल. त्यानंतर क्रूझचा टप्पा सुरू होईल.