व्हिडिओत सदर महिला जमिनीवर बसल्याचे व एक पुरुष तिला फटके मारताना दिसत आहे. ही घटना केव्हाची आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण मानवाधिकार संघटनांनी संयुक्त राष्ट्राकडे तालिबानच्या राजवटीत घडणाऱ्या अशा घटनांच्या चौकशीची मागणी केली आहे.
नवी दिल्ली – अफगाणिस्तानमधील सत्ताधारी तालिबानने एका महिलेला जाहीरपणे कोरडे ओढल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. ही महिला कोणत्याही पुरुषाविना बाजारात एकटी शॉपिंग करत होती. या मारहाणीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत सदर महिला जमिनीवर बसल्याचे व एक पुरुष तिला फटके मारताना दिसत आहे. ही घटना केव्हाची आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण मानवाधिकार संघटनांनी संयुक्त राष्ट्राकडे तालिबानच्या राजवटीत घडणाऱ्या अशा घटनांच्या चौकशीची मागणी केली आहे.
अफगाणिस्तानातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे असे अनेक व्हिडिओ उजेडात येत आहेत. २९ नोव्हेंबर रोजी तालिबानने काही मुलींना बाल्ख क्षेत्रातील विद्यापीठात जाण्यापासून रोखले होते. कारण, त्यांनी आपला चेहरा योग्यपणे झाकला नव्हता. अफगाणिस्तानातील तालिबानच्या सत्तेला १५ महिने लोटलेत. या कालावधीत मानवाधिकार कार्यकर्त्यांनी अनेकदा संयुक्त राष्ट्राकडे महिलाधिकारांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. या अंतर्गत २५ नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्राच्या एका तज्ज्ञानेही तालिबानच्या राजवटीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत चौकशी करण्याची मागणी केली आहे.