Landlords do not get tenants due to work from home

वर्षभरानंतर पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल आहे. देश लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे. दरम्यान, 'वर्क फ्रॉम होम' ही (work from home culture) पद्धत कायमसाठीच सुरू ठेवण्यासाठी ८७ टक्के भारतीय उद्योग गांभीर्याने विचार करत असल्याचं बीसीजी आणि झूम  या कंपन्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आलं आहे.

  नवी दिल्ली :  कोरोना(corona) आणि लॉकडाऊनमुळे(lockdown) गेल्या वर्षभरापासून अनेक कंपन्यांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) पद्धत सुरु झाली.वर्षभरानंतर पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल आहे. देश लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे. दरम्यान, ‘वर्क फ्रॉम होम’ (work from home)ही पद्धत कायमसाठीच सुरू ठेवण्यासाठी ८७ टक्के भारतीय उद्योग गांभीर्याने विचार करत असल्याचं बीसीजी आणि झूम  या कंपन्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आलं आहे.

  ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा ऑफिसबाहेरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत आता तिपटीने वाढ झाली असल्याचं निरीक्षणही या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे.

  ‘बीसीजी’ने सर्वेक्षणातून गोळा केलेली माहिती आणि नोंदवलेली निरीक्षणं यांच्या आधारावर झूम कंपनीने अहवाल तयार केला. हा अहवाल भारत, अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रान्स आणि जर्मनी या सहा देशांतल्या महत्त्वाच्या उद्योग व्यवसायांबद्दलच्या निरीक्षणांवर आधारित आहे.
  सर्वेक्षण केलेल्या उद्योग-व्यवसायांच्या बाबतीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये व्यतीत केलेल्या कालावधीत तीन ते पाच पटींनी वाढ झाली असल्याचे समजते.

  सर्वेक्षण केलेल्यापैकी ७० टक्के मॅनेजर्स कोरोनाच्या काळाच्या तुलनेत आता ऑफिसबाहेरून काम करण्याच्या मॉडेलचा विचार करत आहेत. तसेच महामारीपूर्वीच्या तुलनेत एक तृतीयांशहून अधिक कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये न येता काम करावं, असं उद्योग-व्यवसायांना वाटत असल्याचंही या सर्वेक्षणातून दिसून आलं.

  कोरोनाच्या (Pandemic) थैमानामुळे जगभरात अनेक देशांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आलं. त्यामुळे ऑफिसमध्ये न जाता घरूनच काम करण्याची पद्धत, तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आदींची वेगाने अंमलबजावणी करण्यात आली.

  ‘वर्क फ्रॉम होम’ची प्रभावीपणे आणि सुरळीतपणे अंमलबजावणी झाल्यामुळे अनेक देश उद्योग-व्यवसाय पैशांची बचत करू शकले. महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे कित्येक जण बेरोजगार झाले पण वर्क फ्रॉम होम आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय यांच्या अंमलबजावणीमुळे अनेकांच्या नोकऱ्या वाचल्या आहेत.