flight

रशियाची राजधानी मॉस्कोवरून 240 प्रवाशांना घेऊन गोव्याला जात असलेल्या एका चार्टर्ड विमानाला शनिवारी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर विमान उज्बेकिस्तानला (Uzbekistan) वळवण्यात आलं.

    पणजी : मॉस्कोवरून गोव्याला (Mosco To Goa Flight) जाणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी (Bomb Threat) मिळाली आहे. या धमकीनंतर विमानाला उज्बेकिस्तानकडे वळवण्यात आलं आहे. पीटीआयनुसार (PTI)  रशियाची राजधानी मॉस्कोवरून 240 प्रवाशांना घेऊन गोव्याला जात असलेल्या एका चार्टर्ड विमानाला शनिवारी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर विमान उज्बेकिस्तानला (Uzbekistan) वळवण्यात आलं. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.


    इमेलवरून धमकी
    एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, विमानाला सकाळी सव्वा चार वाजता दक्षिण गोव्याच्या डालोबिम विमानतळावर उतरविणे अपेक्षित होते. त्यांनी सांगितलं की, फ्लाइट नंबर (AZV2463)ला भारतीय हवाई क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याआधी वळवण्यात आलं आहे. डाबोलिम विमानतळाचे संचालकांना 12.30 वाजता विमानात बॉम्ब लावल्याचा इमेल पाठवण्यात आला. त्यानंतर विमानाला वळवण्यात आलं.

    याआधीही गेल्या आठवड्यात विमान बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर मॉस्को-गोवा विमानाचं गुजरातच्या जामनगर विमानतळावर आपात्कालीन लँडींग करण्यात आलं.