
कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने तीन दिवसांत तीन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेतली. त्यांनी T3 ची रणनीती म्हणजे टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट अवलंब करण्याचे निर्देश संबधित यंत्रणेला दिले.
चीनने जगभरातील देशांच टेन्शन वाढवलं आहे. भारतातही कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकार सतर्क झालं आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, आता चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी आवश्यक करण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी दिली. या प्रवाशामध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळल्यास किंवा चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास या लोकांना क्वारंटाईन करण्यात येईल.
गेल्या 24 तासात देशात 201 नव्या रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासांत देशात 201 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या भारतात 3,397 सक्रिय रुग्ण आहेत, जी एकूण रुग्णसंख्यापैकी 0.01% आहे. तर कोरोन रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.8% आहे. गेल्या 24 तासांत 183 लोक बरे झाले असून एकूण बरे झालेल्यांची संख्या 4,41,42,791 झाली आहे.