tsunami

फिलिपाइन्समधील मिंडानाओ येथे शनिवारी ७.५ तीव्रतेचा भूकंप झाला, असे युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) ने सांगितले.

  गेल्या महिण्यात झालेल्या भुकंपातुन फिलिपाइन्स (Philippines) अद्याप सावरला नाही. मात्र आता पुन्हा फिलिपाइन्समध्ये शनिवारी ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपानंतर अमेरिकन त्सुनामी सिस्टमने आता सुनामीचा इशारा (Tsunami after heavy earthquake in Philippines) जारी केला आहे. पॅसिफिक प्रदेशाच्या रिंग ऑफ फायरमध्ये असलेल्या फिलिपाइन्समध्ये दररोज भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

  EMSC ने भूकंपाची माहिती दिली
  फिलिपाइन्समधील मिंडानाओ येथे शनिवारी ७.५ तीव्रतेचा भूकंप झाला, असे युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) ने सांगितले. हा भूकंप मिंडानाओ येथे ६३ किमी (३९ मैल) खोलीवर झाला.

  आता त्सुनामीचा इशारा

  फिलिपाइन्समधील भूकंपानंतर आता त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपानंतर अमेरिकेच्या त्सुनामी वॉर्निंग सिस्टमने सुनामीचा इशारा दिला आहे.

  गेल्या महिन्यातील भूकंपात 8 जणांचा मृत्यू

  गेल्या महिन्यात दक्षिण फिलीपिन्समध्ये ६.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपात किमान आठ जणांचा मृत्यू झाला. 17 नोव्हेंबरच्या भूकंपातील मृत्यू सारंगानी, दक्षिण कोटाबाटो आणि दावो ऑक्सीडेंटल प्रांतांमध्ये झाले. या भूकंपात 13 जण जखमी झाले आहेत तर 50 हून अधिक घरे आणि इतर इमारतींचे नुकसान झाले.

  फिलिपाइन्समध्ये नेहमी होतात भूकंप

  फिलीपिन्स पॅसिफिक प्रदेशात रिंग ऑफ फायरमध्ये स्थित आहे. येथे अनेकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवतात. हा जगातील भूकंपाचा झोन आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे फिलीपिन्सचे वर्णन जगातील सर्वात भूकंप आणि ज्वालामुखी सक्रिय प्रदेश म्हणून करते.