
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांचा (Karnataka Assembly Elections) प्रचार शिगेला पोहचलेला आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी या निवडणुकांसाठी जोर लावलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवस कर्नाटकच्या दौऱ्यावर असून, ते काँग्रेसवर सडकून टीका करताना दिसतायेत.
बंगळुरु : कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांचा (Karnataka Assembly Elections) प्रचार शिगेला पोहचलेला आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी या निवडणुकांसाठी जोर लावलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवस कर्नाटकच्या दौऱ्यावर असून, ते काँग्रेसवर सडकून टीका करताना दिसतायेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांना घेरण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत. त्यातच मंगळवारी काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेसनं जाहीरनाम्यात (Congress Manifesto) पीएफआय या संघटनेबरोबरच बजरंग दलावरही बंदी आणण्याचं आश्वासन दिलंय. याच मुद्द्याचं भावनिक राजकारण पंतप्रधान मोदी करताना दिसलेत. बजरंग दलावर बंदीचा अर्थ त्यांनी बजरंगबलीशी जोडला आहे. हा हनुमानाचा अपमान असल्याची टीका करत, त्यांनी हा मुद्दा प्रचारात तापवण्याचा प्रयत्न केलाय.
पंतप्रधानांनी काँग्रेसला घेरलं
मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपाच्या स्टार प्रचारकांनी या मुद्द्यावरुन काँग्रेसला अडचणीत आणण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी विजयनगरमध्ये झालेल्या एका सभेत काँग्रेसवर टीकास्त्र योडलंय. आधी प्रभू रामरायाला कुलुपात बंद करणारी काँग्रेस आता बजरंगबलीलाही जेलमध्ये कैद करु इच्छिते आहे, असं सांगत त्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केलाय.
पंतप्रधान मोदी म्हणालेत की – दुर्दैव पाहा, आज या ठिकाणी मी बजरंगबलीच्या दर्शनासाठी आलो आहे आणि दुसरीकडं काँग्रेसनं त्यांच्या जाहीरनाम्यात बजरंगबलीला कुलुपांत बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आधी प्रभू श्रीरामाला कुलुपात बंद करुन ठेवलं होतं, आणि आता जय बजरंगबली म्हणणाऱ्यांना कुलुपांत ठेवण्याचा संकल्प काँग्रेसनं केलेला आहे.
या सगळ्याला कर्नाटकातील जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असं अमित शाहा म्हणाले आहेत.
जिन्नानीही असा जाहीरनामा प्रसिद्ध केला नसता : भाजपा
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बि,स,्वा यांनीही यावरुन टीकेची झोड उठवलेली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिमांचा जाहीरनामा असल्याची टीका हेमंत बिस्वा याांनी केलीय. बंगळुरुत झालेल्या सभेत बिस्वा म्हणालेत की, पीएफआयवर पहिल्यांदाच बंदी घालण्यात आलेली आहे. भाजपानं पीएफआयवर बंदी घातली म्हणून लांगूलचालनासाठी आता काँग्रेस बजरंग दलावर बंदी घालण्याचं आश्वासन देते आहे. हा मुस्लिमांचा एजेंडा आहे. पीएफआय जे म्हणू शकत नाही ते काँग्रेस म्हणते आहे. हनुमानाचा अपमान करत पीएफआयला वाचवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरु असल्याची टीका भाजपा नेते करतायेत.
बजरंगदलाची तुलना बजरंग बलीशी करणं अयोग्य : काँग्रेस
भाजपाच्या या टीकेला काँग्रेसनंही उत्तरं दिलंय. बजरंग बलीची तुलना बजरंग दलाशी करणं, हा हनुमान भक्तांचा अपमान आहे, अशी टीका काँग्रेस नेते करतायेत. या प्रकरणात पंतप्रधानांनी हनुमान भक्तांची माफी मागायला हवी, असं काँग्रेस नेते पवन खेडा म्हणालेत. यावेळी खेडा यांनी त्यांच्या खिशात ठेवलेली हनुमान चालिसाही माध्यमांना दाखवली.