म्यानमारमधील सत्तापालटानंतर ३०० निर्वासित भारतात दाखल, पोलीस दलातील जवानांची संख्या अधिक

भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर तेथील ३०० निर्वासित(300 homeless myanmar citizen came to India) भारतात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, यापैकी१५० निर्वासित म्यानमार पोलीस दलातील जवान आहे.

    दिल्ली: भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर तेथील ३०० निर्वासित(300 homeless myanmar citizen came to India) भारतात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, यापैकी१५० निर्वासित म्यानमार पोलीस दलातील जवान आहे.

    या जवानांनी लष्करी राजवटीचा विरोध करीत नागरिकांच्या आंदोलनाचे समर्थन केले होते. म्यानमारमध्ये सैन्याने, जनतेने निवडून दिलेले सरकार हटवून सत्तापालट घडवून आणले. याविरोधात तेथील नागरिक रस्त्यांवर उतरले असून तीव्र निदर्शने सुरू आहेत. लष्करांकडून ही निदर्शने चिरडून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    सत्तापालटानंतर म्यानमारने शेजारी देशांसाठी आपले दरवाजे पूर्णत: बंद केले आहे. कोरोनाचा बहाणा करून बाहेरच्या देशातील माध्यमांना लष्कराने म्यानमारमध्ये प्रवेश नाकारला आहे. नागरिकांच्या आंदोलनाला आता तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांचेही बळ मिळाले आहे. जवळपास १०० डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि फार्मासिस्ट मांडलेमध्ये निदर्शने करताना दिसून आले.