सिनेमागृहाचा प्रतिकात्मक फोटो
सिनेमागृहाचा प्रतिकात्मक फोटो

अनंतनाग, श्रीनगर, बांदीपोरा, गंदरबल, दोडा, राजोरी, पूंछ, किश्तवाड आणि रियासी येथे लवकरच सिनेमा हॉलचे उद्घाटन होणार आहे.

    काश्मीर खोऱ्यात (Kashmir) तब्बल तीन दशकांनंतर मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचे लोकांचे स्वप्न मंगळवारी घाटीच्या पहिल्या मल्टिप्लेक्स सिनेमाच्या उद्घाटनाने साकार होणार आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.

    यावेळी आमिर खानचा लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसह मल्टिप्लेक्स मंगळवारी लोकांसाठी खुले केले जाईल. 30 सप्टेंबरपासून हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनीत विक्रम वेधच्या स्क्रीनिंगसह नियमित शो सुरू होतील.

    काश्मीरच्या पहिल्या मल्टिप्लेक्समध्ये एकूण ५२० आसनक्षमतेचे तीन सिनेमागृह असतील. स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या परिसरात फूड कोर्ट देखील असेल.

    रविवारी पुलवामा आणि शोपियानमध्ये मल्टिप्लेक्सचे उद्घाटन करताना लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले होते की लवकरच जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यात असे बहुउद्देशीय सिनेमा हॉल सुरू केले जातील. अनंतनाग, श्रीनगर, बांदीपोरा, गंदरबल, दोडा, राजोरी, पूंछ, किश्तवाड आणि रियासी येथे लवकरच सिनेमा हॉलचे उद्घाटन होणार आहे.