YouTube पाहून महिलेची डिलिव्हरी करणं बेतलं जीवावर; महिलेचा झाला मृत्यू

सध्याच्या इंटरनेटच्या युगात कोणत्याही गोष्टीविषयी माहिती घ्यायची असेल तर आपण गुगल, युट्यूबचा (YouTube Video) आधार घेतो. त्यातून अनेकदा चांगली माहिती मिळतेही. पण त्यावर पूर्णत: आधारित राहणं जीवावर बेतू शकतं. असाच एक प्रकार तामिळनाडूतील पोचमपल्‍लीजवळील पुलियामपट्टी येथे घडला.

    पुलियामपट्टी : सध्याच्या इंटरनेटच्या युगात कोणत्याही गोष्टीविषयी माहिती घ्यायची असेल तर आपण गुगल, युट्यूबचा (YouTube Video) आधार घेतो. त्यातून अनेकदा चांगली माहिती मिळतेही. पण त्यावर पूर्णत: आधारित राहणं जीवावर बेतू शकतं. असाच एक प्रकार तामिळनाडूतील पोचमपल्‍लीजवळील पुलियामपट्टी येथे घडला. एका व्यक्तीने युट्यूब पाहून (YouTube) त्याच्या पत्नीची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये महिलेचा मृत्यू झाला.

    पुलियामपट्टी येथील डी. मधेश (वय 30) याचे लोगनयागी (वय 27) हिच्‍याशी विवाह झाला. हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. विवाहानंतर लोगनयागी या गर्भवती राहिल्या. दाम्‍पत्‍याने निसर्गोपचार घेत घरीच उपचार सुरु केले. पण रुग्‍णालयात न जात घरातच प्रसूती करण्‍याचा निर्णय दाम्‍पत्‍याने घेतला. लोगनयागी यांना मंगळवारी (दि.22) प्रसूती वेदना सुरु झाल्‍या. त्यावेळी महिलेच्या पतीने युट्यूब पाहून प्रसूती करण्याचे ठरवले.

    लोगनयागी या महिलेने एका मुलाला जन्म दिला. मात्र, नाळ कापताना गुंतागुंत झाली आणि लोगनयागी हिला प्रचंड रक्‍तस्‍त्राव झाला. मधेश याने पत्‍नीला सकाळी पोचमपल्‍ली येथील एका खासगी रुग्‍णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी तिच्‍यावर उपचारापूर्वीच मृत्‍यू झाल्‍याचे जाहीर केले. दरम्यान, या प्रकरणी पतीला जबाबदार धरत पोलिसांनी डी. मधेश याला अटक केली.