अग्निपथला विरोध : ५०० पेक्षा अधिक गाड्या रेल्वेकडून रद्द

    अग्निपथ (Agneepath Scheme)  संरक्षण भरती योजनेला देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध (Protest) होत आहे. तसेच, अनेक राज्यांमध्ये तरुणांनी केलेल्या विरोधामुळे रेल्वेने (Indian Railway) मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी ५०० पेक्षा अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

    अग्निपथ संरक्षण भरतीला देशभरातून विरोध वाढला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने तरुणांकडून संताप व्यक्त होत असून त्याला हिंस्त्र स्वरुप आले आहे. या पार्श्वभूमीवर ५३९ गाड्या प्रभावित झाल्या आहेत. यामध्ये १८१ मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि ३४८ प्रवासी गाड्यांसह ५२९ गाड्या रद्द (Express Cancelled) करण्यात आल्या, असे रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे.