कृषीमंत्री धनंजय मुंडे दिल्लीत, मात्र कांदा उत्पादकांचा प्रश्न सोडवण्याचं श्रेय फडणवीस, गोयल व अमित शाहांना, काय घडला घटनाक्रम?

केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे. पण फडणवीस जपान दौ-यावर असताना आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयलांना कांदाप्रश्नी चर्चा करण्यासाठी दिल्लीत असताना, या भेटीपूर्वीच फडणवीसांनी ट्विट करत श्रेय घेतले आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.

    नवी दिल्ली – शनिवारी केंद्र सरकारने (Central government) कांदा (onion) निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसताहेत. कांद्या निर्यात शुल्क वाढीच्या निषेधार्थ आज राज्यभर आंदोलन करण्यात येत असताना, आता केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे. पण फडणवीस जपान दौ-यावर असताना आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयलांना कांदाप्रश्नी चर्चा करण्यासाठी दिल्लीत असताना, या भेटीपूर्वीच फडणवीसांनी ट्विट करत श्रेय घेतले आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. (Agriculture Minister Dhananjay Munde in Delhi, but Fadnavis, Goyal and Amit Shah are credited with solving the problem of onion producers, what happened)

    कांदा प्रश्न केव्हा पेटला 

    दरम्यान, कांद्यावरील महागाई आण कांद्याचे भाव कमी करण्यासाठी कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क केंद्राने लावण्याचा निर्णय शनिवारी घेतला. यानंतर रविवारी सुट्टी असल्यान नाशिकमधून अनेक कंटेनर काल जेएनपीट अकडकून पडले होते. कालपासन कांद्या निर्यात शुल्काचे पडसाद राज्यभर उमटताना दिसताहेत. काल राज्यतील विविध भागात शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन करत तसेच कांदा लिलाव बंद करत, सरकारच्या निर्यात शुल्कवाढीचा निषेध केला.

    आज काय झाले?

    कालपासून कांदा लिलाव बंद आहे, तसेच नाफेड, नाशिक, लासलगाव आदी ठिकाणी कांदा विक्रि बंद ठेवण्यात आली आहे. कांदा प्रश्नी आज सकाळी राज्याच कृषीमंत्री धनंजय मुंडे हे यावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीला गेलेत. तसेच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर व केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना भेटून चर्चा करणार होते. व कांदाप्रश्नी तोडगा काढण्याची विनंती करणार होते. मात्र त्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी जपान दौऱ्यावर असून देखील सर्वात आधी बाजी मारली.

    आज सर्वात आधी फडणवीसांचे ट्विट

    दरम्यान, कृषीमंत्री मुंडे दिल्लीला असतानाच फडणवीसांनी केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याचं ट्विट केले. जपान दौऱ्यावर असून देखील फडणवीसांनी शहा व गोयलांशी चर्चा केली होती. व याचे श्रेय फडणवीसांना घेता आले, त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. “महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल”. असं टिव्ट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

    श्रेय फडणवीस, गोयल व अमित शाहांना

    कृषीमंत्री धनंजय मुंडे वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना भेटण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी जपानमधून ट्विट करत श्रेय घेणाचा प्रयत्न केला. मुंडेंच्या चर्चेपूर्वीच फडणवीसांनी आधीच गोयल, शहांशी चर्चा केली. अजित पवार गटाचला श्रेय मिळू दिलेलं नाही, अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, नाशिक, नगरमधून कांदा खरेदीसाठी विशेष केंद्र उभारणार असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं आहे. 2410 प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी होणार आहे. यापूर्वी 11 आणि 12 रुपयांत कांदा खरेदी करण्यात येत होता, तो आता 24 रुपयांनी नाफेड खरेदी करण्यात येणार आहे. 2 लाखांपेक्षा जास्त टन असेल तरीही कांदा केंद्र सरकार खरेदी करणार आहे. निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय मात्र केंद्रानं घेतलेला नाही. यामुळं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच फडणवीसांनी अजितदादा गटावर कुरघोडी करत, सरकारमध्ये आपणच नंबर वन असल्याचं दाखवून दिलं आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.