आनंदाची बातमी! निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकार घर घेणाऱ्यांना देणार गिफ्ट; गृहकर्जावरील व्याजावर सबसिडी मिळणार? पीएम आवास योजना…

२०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहकर्जावर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकेल,अशा प्रकारे गृहकर्जांवर व्याजअनुदान दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणामध्ये म्हटले होते.

    नवी दिल्ली – जर तुम्ही घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर, आता हे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण या स्वप्नांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान आवास योजना (PM Awas Yojana) आणली होती. म्हणजे गृहकर्जावर २ लाख ६७ हजार सबसिडी देण्यात आली होती. ही योजना जानेवारी २०२३ पर्यंत होती. पण ह्या योजनेला बढावा देणार असल्याचं वित्तमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात तसा सूतोवाच केला होता. यानंतर आता आगामी २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहकर्जावर (home loan) सबसिडी देण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. (Ahead of the elections, the Modi government will give a gift to the home buyers; Will you get subsidy on interest on home loan)

    सबसिडी मिळणार?

    आगामी काळात देशाच्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, तसेच २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहकर्जावर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकेल,अशा प्रकारे गृहकर्जांवर व्याजअनुदान दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणामध्ये म्हटले होते. केंद्र सरकार ६०० अब्ज रुपये अर्थात ७.२० अब्ज अमेरिकी डॉलर इतके व्याज अनुदान देण्याचा विचार करत आहे. हे अनुदान पुढील पाच वर्षांसाठी छोट्या नागरी घरांसाठी दिले जाईल, अशी माहिती रॉयटर या वृत्तसंस्थेने दिली आहे.

    पीएम आवास योजना पुन्हा सुरु होणार

    दरम्यान, गृहकर्जासाठी शहरी व ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २० वर्षांसाठी ५० लाख रुपयांपेक्षा कमी रकमेचे गृहकर्ज घेतले असेल, तर त्यावर दोन लाख ६७ हजार रुपये सबसिडी मिळायची. ही पण ही योजना जानेवारी २०२३ पासून बंद करण्यात आली. आणि त्यानंतर ज्यांनी गृहकर्ज घेतले आहे, त्यांना या योजनेला लाभ घेता आला नाही. मात्र आता पुन्हा एकदा ही योजना सुरु करण्याचा सरकारचा विचार सुरु आहे. गृहकर्जावर ३ ते ६.५ टक्के व्याजअनुदान देण्यात येईल. असे मिळालेले व्याजअनुदान थेट संबंधित ऋणकोच्या बँक खात्यात जमा केले जाईल. ही योजना २०२८पर्यंत सुरू राहील. मात्र, ही योजना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केल्याखेरीज लागू करण्यात येणार नाही. त्यामुळं ही योजना लवकरात लवकर सुरु व्हावी, यासाठी गृहकर्जादात्यांची इच्छा आहे. तसेच याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.