
भारताविरोधात रात्रदिवस कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांमुळे (Pakistan Terrorism) संपूर्ण जग चिंतेत आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) मॉस्कोमध्ये होते. तेथे त्यांनी अफगाणिस्तानवरील एका महत्त्वाच्या बैठकीत भाग घेतला.
नवी दिल्ली : भारताविरोधात रात्रदिवस कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांमुळे (Pakistan Terrorism) संपूर्ण जग चिंतेत आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) मॉस्कोमध्ये होते. तेथे त्यांनी अफगाणिस्तानवरील एका महत्त्वाच्या बैठकीत भाग घेतला. यावेळी प्रादेशिक सुरक्षेबाबत गंभीर चर्चा झाली. डोवाल (Ajit Doval Speech) यांनी इसिस, लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammed) सामना करण्यासाठी प्रचंड गुप्तचर आणि सुरक्षा सहकार्य आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यादरम्यान डोवाल यांनी अफगाणिस्तानबाबत चीन आणि पाकिस्तानचा नापाक अजेंडाच उघड केला.
भारत अफगाण जनतेच्या पाठीशी उभा
डोवाल मॉस्कोमध्ये स्पष्टपणे म्हणाले की, भारत अफगाण लोकांना त्यांच्या गरजेच्या वेळी एकटे सोडणार नाही. एनएसएने म्हटले की, या ठिकाणी दहशतवाद हा सर्वात मोठा धोका बनला आहे आणि दाएश किंवा इस्लामिक स्टेट, लष्कर आणि जैशचा मुकाबला करण्यासाठी देश आणि त्यांच्या एजन्सींमधील सर्वसमावेशक गुप्तचर आणि सुरक्षा सहकार्य आवश्यक आहे.
परिषदेत उच्चाधिकारी उपस्थित
यजमान देश आणि भारताव्यतिरिक्त, अफगाणिस्तानवरील सुरक्षा परिषदेच्या सचिवांच्या पाचव्या बहुपक्षीय बैठकीत इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, चीन, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे उच्च अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी, तिसरी बहुपक्षीय बैठक नोव्हेंबर 2021 मध्ये डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे झाली होती.
डोवाल यांनी साधला पाकिस्तानवर निशाणा
कोणत्याही देशाला दहशतवाद आणि कट्टरतावाद पसरवण्यासाठी अफगाण भूमीचा वापर करू देऊ नये. त्याचा संदर्भ थेट पाकिस्तानकडे होता. डोवाल यांनी अफगाणिस्तानच्या हितसंबंधांबद्दल अशावेळी बोलले, जेव्हा चीन तालिबानशी खनिज संपत्तीचे शोषण करण्यासाठी करार करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातील नैसर्गिक संसाधनांचा अफगाण जनतेच्या हितासाठी वापर केला पाहिजे, असेही डोवाल म्हणाले.