अल कायदाने दिली द्वारकाधीश मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मंदिराची सुरक्षा वाढवली

मंदिराकडे येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील प्रत्येक बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरही पथकाची करडी नजर आहे.

    नवी दिल्ली – गुजरातमधील द्वारका येथील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरावर दहशतवादी संघटना अल कायदाने दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. अल कायदाच्या या धमकीनंतर मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज्य सरकार, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. मंदिराकडे येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील प्रत्येक बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरही पथकाची करडी नजर आहे.

    द्वारका जिल्हा तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे, जो सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात.