नेमबाज वर्तिका सिंहचे आरोप; काँग्रेसने मागितला इराणींना राजीनामा

स्मृती इराणी यांनी राजीनामा देऊन निष्पक्ष चौकशीला सामोरे जायला हवे.  यात किती तथ्य आहे हे आम्हाला माहित नाही परंतु चौकशी होईपर्यंत तरी त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असे सुरजेवाला म्हणाले.

दिल्ली. नेमबाज वर्तिका सिंहने केलेल्या आरोपांचा दाखला देत काँग्रेसने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.  इराणींवरील आरोप गंभीर असल्याचे मत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केले.  या प्रकरणी दोषांना शिक्षा ठोठावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यायालयीन चौकशीचे आदेश द्यावे  असेही रणदीप सुरजेवाला म्हणाले. उल्लेखनीय असे की राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यत्वासाठी स्मृती इराणींसह अन्य दोन व्यक्तींनी लाच मागितली होती, असा गंभीर आरोप वर्तिकासिंहने केला होता.

न्यायालयीन चौकशीची मागणी
स्मृती इराणी यांनी राजीनामा देऊन निष्पक्ष चौकशीला सामोरे जायला हवे.  यात किती तथ्य आहे हे आम्हाला माहित नाही परंतु चौकशी होईपर्यंत तरी त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असे सुरजेवाला म्हणाले.  पंतप्रधानांनी न्यालयीन चौकशीचे आदेश द्यावे आणि सहा महिन्यात अहवाल आल्यानंतर दोषी असेल तर स्मृती इराणींना शिक्षा ठोठवावी व नसल्यास जे चुकीचे आहेत त्यांना शिक्षा ठोठवावी व स्मृती इराणींनी मंत्रिपद पुन्हा बहाल करावे असे सुरजेवाला म्हणाले.