ट्विटर-फेसबुकनंतर आता गुगलमध्येही कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

एका अहवालानुसार, गुगलने कर्मचाऱ्यांसाठी नवीन रँकिंग आणि परफॉर्मन्स प्लॅन बनवला आहे. यानुसार चांगली कामगिरी नसलेल्या कर्मचाऱ्यांना गुगलचे व्यवस्थापन कामावरून काढून टाकू शकेल.

    नवी दिल्ली – मेटा, अॅमेझॉन, ट्विटरनंतर आता गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट आपल्या १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. कंपनी आपल्या एकूण कर्मचार्‍यांच्या ६ टक्के कर्मचाऱ्यांना कमी करू शकते. याअंतर्गत ‘खराब कामगिरी करणाऱ्या’ कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे.

    एका अहवालानुसार, गुगलने कर्मचाऱ्यांसाठी नवीन रँकिंग आणि परफॉर्मन्स प्लॅन बनवला आहे. यानुसार चांगली कामगिरी नसलेल्या कर्मचाऱ्यांना गुगलचे व्यवस्थापन कामावरून काढून टाकू शकेल. या प्रणालीमध्ये व्यवस्थापक या कर्मचाऱ्यांसाठी रेटिंग वापरू शकतात. जेणेकरुन त्यांचे बोनस आणि इतर अनुदाने थांबवू शकतील.