आधीच परीक्षेचं टेन्शन, त्यात परीक्षा केंद्रावर फक्त 500 मुलीच, एकटा मुलगा घाबरुन पडलाना बेशुद्ध. पुढं..

परीक्षा (Exam) देण्यासाठी पोहचलेल्या केंद्रावर 500 मुलींमध्ये (Girls) एकच मुलगा (Boy)होता. परीक्षा आणि या मुलींचं टेन्शन घेऊन हा मुलगा चक्क बेशुद्ध पडल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील ही घटना आहे.

    नालंदा : परीक्षा (Exam) देण्यासाठी पोहचलेल्या केंद्रावर 500 मुलींमध्ये (Girls) एकच मुलगा (Boy)होता. परीक्षा आणि या मुलींचं टेन्शन घेऊन हा मुलगा चक्क बेशुद्ध पडल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील ही घटना आहे. या सगळ्या गोंधळातच या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता या प्रकाराची चर्चा सगळीकडे रंगते आहे.

    नेमका काय घडला प्रकार? 

    बिहारशरीफच्या अल्लामा इक्बाल कॉलेजचा विद्यार्थी मनीस शंकर हा इंटर परीक्षेसाठी केंद्रावर पोहचला. त्याला ब्रिलियन्ट स्कूल हे केंद्र मिळालं होतं. मनीष सकाळी जेव्हा केंद्रावर पोहचला तेव्हा त्याला सगळीकडं मुलीच दिसत होत्या. सुमारे 500 मुली या केंद्रावर होत्या. आणि त्यात मनिष हा एकटाच मुलगा होता. आधीच परीक्षेचं टेन्शन आलेल्या मनिषला या मुलींमुळे अधिकचं टेन्शन आलं. त्याची प्रकृती बिघडली आणि तो परीक्षा केंद्रावरच बेशुद्ध पडल्याची घटना घडली.

    मुलींना पाहून घाबरला, घरच्यांनी सांगितलं कारण 

    परीक्षा केंद्रावर जास्त मुली पाहिल्यानं मनिष घाबरला आणि त्यामुळं तो बेशुद्ध पडला अशी माहिती त्याच्या काकूनं दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये अपचार करण्यात आले आणि आता त्याची प्रकृती ठीक असल्याचंही त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. एकूणच मुलींचं टेन्शन घेून चक्कर येऊन पडलेल्या या मुलाची चर्चा सध्या चांगलीच रंगते आहे.