ऑक्सिजन सपोर्टवर होते 20 नवजात अर्भक, तीच लाईन कापून चोरटे झाले पसार अन् पुढं असं झालं…

राजस्थानच्या अल्वर (Incident in Alwar) शहरात रविवारी रात्री एक मोठी घटना घडली. अल्वर जिल्ह्यातील गीतानंद रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या 20 नवजात अर्भकांची ऑक्सिजन लाईनच (Oxygen Line) चोरट्याने कापून नेली.

    अल्वर : राजस्थानच्या अल्वर (Incident in Alwar) शहरात रविवारी रात्री एक मोठी घटना घडली. अल्वर जिल्ह्यातील गीतानंद रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या 20 नवजात अर्भकांची ऑक्सिजन लाईनच (Oxygen Line) चोरट्याने कापून नेली. या घटनेमुळे मोठी खळबळ (Alwar Hospital) उडाली.

    रुग्णालयात अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद

    अल्वर येथे असलेल्या या रुग्णालयात वीसहून अधिक नवजात बालकांना आजारपणामुळे रुग्णालयाच्या ऑक्सिजन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. सर्व मुले रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली होती. रात्री उशिरा अचानक या मुलांना त्रास होऊ लागला. याबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला माहिती दिली. तत्काळ तपास केला असता ऑक्सिजनच्या सपोर्टमध्ये कोणीतरी छेडछाड केल्याचे आढळून आले. अधिक तपास केला असता ऑक्सिजनचा पुरवठाच बंद झाल्याचे दिसून आले.

    चोरट्यांनी ऑक्सिजन लाईन चोरली

    वॉर्ड सांभाळणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ताबडतोब सुटे ठेवलेले आठ ऑक्सिजन सिलिंडर उचलले आणि त्यांच्या मदतीने मुलांचे प्राण वाचले. यादरम्यान चोरट्यांनी गोदामातून रुग्णालयाकडे जाणारी पाईपलाईन रुग्णालयाबाहेर कापून चोरी केल्याची माहिती मिळाली.

    ऑक्सिजन पुरवठा बंद

    ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. तेथे उपस्थित असलेल्या मुलांच्या नातेवाईकांच्या मदतीने रात्री उशिरा दोन चोरट्यांनाही सुरक्षारक्षकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर मुलांच्या देखरेखीखाली आहेत. ते सर्व आवश्यक चाचण्या करत आहेत.

    कर्तव्यदक्षता आली कामी

    पोलीस आणि रुग्णालय व्यवस्थापनाच्या कर्तव्यदक्षतेमुळे वीसहून अधिक नवजात बालकांचे प्राण वाचले आहेत. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.