हरियाणातील अंबाला देशात सर्वाधिक प्रदूषित शहर

अंबालासह देशातील सात शहरे ‘अत्यंत खराब’ या श्रेणीत आहेत. गेल्या काही काळापासून प्रदूषणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात अनेक दिवसांनी हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ श्रेणीतून ‘मध्यम’ श्रेणीमध्ये आली आहे.

    देशातील प्रमुख शहरांतील हवा प्रदूषणाबाबतचा (Air Pollution) अहवाल मंडळाने प्रसिद्ध केला केला आहे. महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, औरंगाबादसह गुजरातेतील अहमदाबाद, आगरताळा आदी शहरांतील हवा प्रदूषण उत्कृष्ट (Excellent) किंवा समाधानकारक (Satisfactory) श्रेणीत आहे. हरियाणातील (Haryana) अंबाला (Ambala) देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर (Most Polluted City) ठरले असून तिथे हवा गुणवत्ता निर्देशांक (Air Quility Coordines) ३१८ नोंदविला गेला.

    अंबालासह देशातील सात शहरे ‘अत्यंत खराब’ या श्रेणीत आहेत. गेल्या काही काळापासून प्रदूषणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात अनेक दिवसांनी हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ श्रेणीतून ‘मध्यम’ श्रेणीमध्ये आली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत हवेचा निर्देशांक ५६ नोंदविला गेला.

    तो ‘समाधानकारक’ श्रेणी दर्शवितो. पुण्यात तो ८० असून ‘समाधानकारक’ श्रेणीतच आहे. देशातील ३१ शहरांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक ५० किंवा त्यापेक्षा कमी आहे. नवी मुंबई, चंद्रपूर, कल्याण, केरळची राजधानी तिरुअनंतपुरम, अहमदाबाद (गुजरात), भोपाळ (मध्य प्रदेश), गांधीनगर (गुजरात), जयपूर, जोधपूर, उदयपूर (राजस्थान), विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), वाराणसी (उत्तर प्रदेश) आदी ६३ शहरांमध्येही हवेची गुणवत्ता समाधानकारक असून निर्देशांक ५१ ते १०० च्या दरम्यान नोंदविला गेला.

    देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरे
    हवा सर्वाधिक स्वच्छ शहरांमध्ये (Clean City) एर्नाकुलम (केरळ) ४५, औरंगाबाद (महाराष्ट्र) ४३, कोइमतूर (तमिळनाडू) ४३, आगरताळा (त्रिपुरा) ४२, चामराजनगर (कर्नाटक) ३६, चिक्कमंगळूर (कर्नाटक) ३३, चिक्कबळ्ळापूर (कर्नाटक) ३०, ऐजॉल (मिझोराम) २८, दामोह (मध्य प्रदेश) २७, गंगटोक (सिक्कीम) २६ यांचा समावेश आहे.