
दिल्लीमध्ये ‘आंबेडकर अँड मोदी : रिफॉर्मर्स आयडियाज पर्फॉर्म्सस इम्प्लिमेंटेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या हस्ते करण्यात आले.
दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या हस्ते ‘आंबेडकर अँड मोदी : रिफॉर्मर्स आयडियाज पर्फॉर्म्सस इम्प्लिमेंटेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur), माजी मुख्य न्यायाधीश के.जी. बालकृष्णन (K. G. Balakrishnan), माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन आणि ब्ल्युक्राफ्ट डिजिटल फाऊंडेशनचे हितेश जैन उपस्थित होते.
यावेळी अनुराग ठाकूर म्हणाले की, या पुस्तकात फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनांची माहिती नाही तर त्या कल्पना कशा राबवल्या हेदेखील सांगण्यात आलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षांमध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा या पुस्तकात मांडण्यात आला आहे.
डॉ. आंबेडकरांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य समानता, मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठी समर्पित केलं होतं. सामाजिकदृष्ट्या शोषण झालेल्यांसाठी त्यांनी आवाज उठवला होता. आधुनिक भारत घडवण्यात त्यांचं मोठं योगदान असल्याचंही ठाकूर म्हणाले.ते पुढे म्हणाले की, भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून काम करताना आंबेडकरांनी समाजातील विषमता काढून टाकण्याचं काम केलं. त्यामुळे समानतेची तत्व आज भारतात रुजली आहेत, असेही त्यांनी सांगितले.