देशातील सहकार मजबूत करणं हेच ध्येय – केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांनी सहकार संमेलनात मांडलं मत

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या नेतृत्त्वात देशातील पहिलं सहकार संमेलनाचं (National Cooperative Conference)आयोजन करण्यात आलं आहे. देश-विदेशातील कोट्यवधी लोक ऑनलाईन पद्धतीने या संमेलनात सहभागी होऊ शकतात.

    राजधानी दिल्लीतील(Delhi) इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या नेतृत्त्वात देशातील पहिलं सहकार संमेलनाचं (National Cooperative Conference)आयोजन करण्यात आलं आहे. देश-विदेशातील कोट्यवधी लोक ऑनलाईन पद्धतीने या संमेलनात सहभागी होऊ शकतात. देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा(Amit Shah Speech In Cooperative Conference) यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं.

    अमित शहा म्हणाले, सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद. त्यांनी मला देशाचा पहिला सहकार मंत्री म्हणून निवडलं. देशातील सहकार मजबूत करणं हे आपलं ध्येय आहे. गरिबांचं कल्याण आणि विकास हे सहकाराशिवाय शक्य नाही. गावांना समृद्ध करणं हे सहकारामुळे शक्य आहे. सह आणि कार्य म्हणजे सहकार आहे. एका दिशेने काम केल्यास गरिबांचं कल्याण शक्य करणं आहे. सहकारामध्ये प्रचंड ताकद आहे. सहकारातून समृद्धी हा मोदींनी नारा दिला आहे. मोदींचं ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्था गाठण्यासाठी सहकार क्षेत्र जोर लावेल. सहकार क्षेत्राची आर्थिक ताकद कमी असेल पण मानवी एकतेची ताकद मोठी आहे.

    तेपुढे म्हणाले, देशाच्या विकासात सहकाराचं योगदान आजही आहे. मात्र अनेक घटकांपर्यंत पोहोचणं अद्याप बाकी आहे. आपल्याला कामाची व्याप्ती वाढवायला हवी. शेतकरी, वंचित, दलित, गरीब, मागासलेले या सगळ्यांच्या विकासाचा मार्ग फक्त सहकार हाच आहे. काही लोकांना सहकार आंदोलन कालबाह्य वाटतं. मात्र सहकार आंदोलनाची सर्वाधिक गरज आत्ता आहे. भारतीय जनतेच्या स्वभावातच सहकार आहे, संस्कारांमध्येच सहकार आहे. ही काही बाहेरुन आलेली संकल्पना नाही. त्यामुळे भारतात सहकार आंदोलन कधीच कालबाह्य ठरणार नाही.