PM face for INDIA bloc
PM face for INDIA bloc

केंद्राने एका नव्या कायद्यांतर्गत बीएसएफला आंतरराष्ट्रीय सीमेपासून 50 किमी आतपर्यंत कारवाई करण्याचे अधिकार प्रदान केलेत. यासाठी दंडाधिकाऱ्यांच्या आदेश किंवा वॉरंटची गरज नाही. यापूर्वी बीएसएफला केवळ 15 किमी आतपर्यंत कारवाई करण्याचा अधिकार होता. ममता या दुरुस्तीवर नाराज आहेत.

    कोलकाता – कोलकात्यात शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व बीएसएफच्या अधिकाऱ्यांत वाद झाला. यासंबंधीच्या वृत्तानुसार, यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित होते. ही घटना हावडा येथे आयोजित ईस्टर्न झोनल परिषदेच्या बैठकीत घडली. ममता बीएसएफला सीमेच्या आत 50 किमीपर्यंत कारवाई करण्याचे अधिकार दिल्यामुळे नाराज आहेत. ममतांच्या मते, यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

    केंद्राने एका नव्या कायद्यांतर्गत बीएसएफला आंतरराष्ट्रीय सीमेपासून 50 किमी आतपर्यंत कारवाई करण्याचे अधिकार प्रदान केलेत. यासाठी दंडाधिकाऱ्यांच्या आदेश किंवा वॉरंटची गरज नाही. यापूर्वी बीएसएफला केवळ 15 किमी आतपर्यंत कारवाई करण्याचा अधिकार होता. ममता या दुरुस्तीवर नाराज आहेत. त्यांच्या मते, सीमा सुरक्षा दलाकडील वाढीव अधिकारामुळे जनता व अधिकाऱ्यांत योग्य समन्वय साधता येत नाही.

    ममतांनी गत मे महिन्यात बीएसएफवर गंभीर आरोप केले होते. बीएसएफचे जवान गावात घुसून सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करून बांगलादेशमध्ये पाठवत आहेत. केंद्राच्या अखत्यारित येणारे सीमा सुरक्षा दल आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडे गायींची तस्करी करते. तसेच नागरिकांची हत्या करून त्यांचे मृतदेह बांगलादेशात फेकते. पण त्याचा आरोप बंगाल पोलिसांवर टाकला जातो. त्यामुळे मी राज्य पोलिसांना बीएसएफला रोखण्याचे निर्देश दिलेत. डिसेंबरमध्ये पश्चिम बंगाल विधानसभेने बीएसएफचे अधिकार क्षेत्र वाढवण्याच्या विरोधात एक प्रस्ताव पारित केला होता.