भारत-चीन सीमेची अजिबात चिंता नाही, 1 इंच जमिनीवरही कोणी कब्जा करू शकत नाही; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टच सांगितलं

बंगळुरुमध्ये आयटीबीपीच्या निवासी आणि अनिवासी परिसराच्या उद्घाटन समारंभात अमित शहा बोलत होते. ते म्हणाले की, ITBP हे देशातील सर्वात कठीण भागात काम करणारे सुरक्षा दल आहे. -42 अंश तापमानात सीमेचे रक्षण करण्यासाठी किती दृढ मनोबल असावे लागते, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

    नवी दिल्ली – भारताच्या 1 इंच जमिनीवरही कोणी कब्जा करू शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी म्हटले. मला भारत-चीन सीमेची अजिबात चिंता नाही. कारण, आयटीबीपीचे जवान सीमेवर गस्त घालत आहेत आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. सैनिकांच्या उपस्थितीत भारताच्या जमिनीवर एक इंचही अतिक्रमण करण्याची हिंमत कोणी करत नाही, असे शाह म्हणाले.

    बंगळुरुमध्ये आयटीबीपीच्या निवासी आणि अनिवासी परिसराच्या उद्घाटन समारंभात अमित शहा बोलत होते. ते म्हणाले की, ITBP हे देशातील सर्वात कठीण भागात काम करणारे सुरक्षा दल आहे. -42 अंश तापमानात सीमेचे रक्षण करण्यासाठी किती दृढ मनोबल असावे लागते, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तवांगमधील चकमकीच्या 20 दिवसांनंतर शहा यांचे वक्तव्य आले आहे. शाह यांचे हे वक्तव्य राहुल गांधींच्या विधानावर पलटवार असल्याचे म्हटले जात. ज्यात राहुल यांनी म्हटले होते की चीन आणि पाकिस्तान डोकलाम आणि तवांगसारख्या भागात काहीतरी मोठे करण्याचे नियोजन करत आहेत.

    पुढे शाह म्हणाले की, ITBP ने आपल्या स्थापनेच्या काळात कठीण भौगोलिक परिस्थिती आणि कठीण भागातही चांगली कामगिरी केली आहे. मी जम्मू-काश्मीर आणि लडाखला भेट दिली, तेव्हा तिथले लोक आयटीबीपीच्या जवानांना हिमवीर म्हणतात. हे यश पद्मश्री आणि पद्मभूषण पेक्षाही मोठे आहे. कारण सैनिकांना हे नाव सरकारने दिलेले नाही तर देशातील जनतेने दिले आहे.