अमृतपाल सिंग अजूनही फरार; तर काका आणि ड्रायव्हरचं आत्मसमर्पण, आतापर्यंत काय घडलं जाणून घ्या?

पोलिसांनी शनिवारी अमृतपाल आणि त्याची संघटना 'वारीस दे पंजाब' यांच्यावर मोठी कारवाई सुरू केली होती. मात्र, अमृतपाल सिंग यांचा ताफा जालंधर जिल्ह्यात थांबल्यानंतर तो फरार झाला.

खलिस्तान (खलिस्तान) समर्थक (khalistani Supporter) आणि वारिस पंजाब दे (Waris De Punjab) चा प्रमुख अमृतपाल सिंगचा (Amritpal Singh) काका हरजीत सिंग (हरजीत सिंग) आणि ड्रायव्हर हरप्रीत सिंग (हरप्रीत सिंग) यांनी जालंधर (जालंधर) येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलआहे, तर अमृतपाल सिंग अद्याप फरार आहे. पंजाब पोलीस (पंजाब पोलीस) अमृतपाल सिंगच्या शोध घेत आहेत. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

पंजाबमध्ये इंटरनेट बंद

दरम्यान, पंजाब सरकारने (पंजाब सरकारने) इंटरनेट मोबाइल आणि एसएमएस सेवेवरील बंदी मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत वाढवली आहे. दुसरीकडे पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या ‘वारीस पंजाब दे’ या पाच पंजाबींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू केला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंग प्रकरणात आयएसआय कनेक्शन आणि परदेशी निधीचे समर्थन केले.

आतापर्यंत काय झालं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंगचे काका हरजीत सिंग आणि ड्रायव्हर हरप्रीत सिंग यांनी रविवारी रात्री उशिरा जालंधरच्या मेहतपूर भागातील गुरुद्वाराजवळ आत्मसमर्पण केलं. यावेळी हरजीत सिंग त्याच्याकडुन पिस्तूल ताब्यात घेण्यात आलं असुन तसेच त्याला  आणि 1.25 लाख रुपये रोख दाखवताना एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. हरजीत सिंग आणि हरप्रीत सिंग हे सध्या अमृतसर पोलिसांच्या ताब्यात आहेत.

आतपर्यंत काय घडलं?

पोलीस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरजित सिंगने गायक-कार्यकर्ता दीप सिद्धूने स्थापन केलेल्या ‘वारीस पंजाब दे’ या संस्थेचे खाते हाताळण्यासाठी अमृतपाल सिंगला मदत केली होती. हरजीत अनेकदा अमृतपालसोबत दिसत होता. सिद्धूचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर अमृतपाल संघटनेचा प्रमुख बनला. जालंधरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) स्वर्णदीप सिंग यांनी सांगितले की, अमृतपालचा शोध अजूनही सुरू आहे. यापूर्वी पोलिसांनी अमृतपालच्या ताफ्यातील दोन वाहने जप्त केली होती. सोमवारी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शनिवारी अमृतपाल सिंगच्या कारचा पोलिस पाठलाग करताना दिसत होते. 

अमृतपाल सिंगवर कारवाईला सुरुवात

दरम्यान, पोलिसांनी शनिवारी अमृतपाल आणि त्याची संघटना ‘वारीस पंजाब दे’ यांच्यावर मोठी कारवाई सुरू केली होती. मात्र, अमृतपाल सिंग यांचा ताफा जालंधर जिल्ह्यात थांबल्यानंतर तो फरार झाला. पोलिसांनी रविवारी पंजाबमध्ये त्याच्या आणखी 34 समर्थकांना अटक केली आणि चार जणांना ताब्यात घेतले आणि त्यांना आसाममधील दिब्रुगड तुरुंगात पाठवले. अमृतपाल यांच्या नेतृत्वाखालील ‘वारीस पंजाब दे’ च्या सदस्यांविरुद्ध आणि राज्यातील शांतता आणि सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून, राज्य पोलिसांनी आतापर्यंत 114 जणांना अटक केली आहे. 

अमृतपाल सिंग यांच्यावर ही कारवाई अमृतसरजवळील अजनाळा पोलिस ठाण्यात घडलेल्या घटनेनंतर काही आठवड्यांनंतर करण्यात आली आहे. अमृतपालच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि त्याच्या एका साथीदाराची सुटका करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांना देण्यास भाग पाडले. 

पंजाबमध्ये ‘हाय अलर्ट’ 

तथापि, पंजाब पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आणि जनतेला अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन केले. पोलिसांनी रविवारी सांगितले होते की अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांविरुद्ध जालंधरमध्ये पोलिस नाका फोडल्याबद्दल आणि गावातून एका वाहनातून शस्त्रे जप्त केल्याबद्दल एफआयआर नोंदवला आहे. अमृतपाल सिंगच्या सात साथीदारांच्या अटकेनंतर अमृतसर ग्रामीण पोलिसांनी शनिवारी रात्री शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत आणखी एक एफआयआर नोंदवला. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी सांगितले की ते वेगवेगळ्या देश, राज्ये आणि शहरांमधून बनावट बातम्या आणि द्वेषपूर्ण भाषणांवर लक्ष ठेवून आहेत.

अमृतपालच्या साथीदारांवर एनएसए

फरारी अमृतपालच्या साथीदारांवर एनएसए लावण्यात आला आहे. पंजाब पोलिसांचे आयजी सुखचैन सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडे आयएसआय आणि परदेशी निधीशी संबंध असल्याचे पुरेसे पुरावे आहेत, त्यामुळेच एनएसए लागू करण्यात आला आहे.