माणुसकीला काळीमा फासणारी घटना! उत्तरप्रदेश मध्ये 6 तास दलित व्यक्तीला मारहाण, व्हिडिओचा थरार पाहून आरोपीला अटक

    उत्तर प्रदेश राज्यातील बरेली येथून एक धक्कादायक व्हिडिओ पुढे आला आहे. एका दलित व्यक्तीला काही लोक बेदम मारहाण करत आहेत. पाडित व्यक्ती वारंवार मदत मागतो आहे आणि याचना करतो आहे. तरीही मारहाण करणाऱ्यांचे हृदय द्रावत नाही. व्हिडिओत दिसणारी दृश्ये आपल्याला विचलीत करु शकतात. सदर घटनेची माहिती पोलिसांना 28 ऑक्टोबरला मिळाली होती. पोलिसांनी या प्रकरणात तपास करुन तिघांना अटक केली आहे.