संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शाहपूर-पोलिस स्टेशन परिसरात एका दाम्पत्याने आपल्या अविवाहित गर्भवती मुलीचा गळा दाबून खून (Murder of Daughter) करून तिचा मृतदेह नदीत फेकला. याप्रकरणी आरोपी पालकांना अटक केली आहे.

    मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शाहपूर-पोलिस स्टेशन परिसरात एका दाम्पत्याने आपल्या अविवाहित गर्भवती मुलीचा गळा दाबून खून (Murder of Daughter) करून तिचा मृतदेह नदीत फेकला. याप्रकरणी आरोपी पालकांना अटक केली आहे. बिजेंदर आणि त्याची पत्नी कुसुम यांनी गोयला गावात त्यांच्या अविवाहित गर्भवती मुलीचा (वय 19) गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह नदीत फेकून दिला. तरुणीने प्रियकर राहुलविरुद्ध न्यायालयात जबाब नोंदवण्यास नकार दिल्यामुळे ही हत्या करण्यात आली.

    बिजेंद्र आणि कुसुम यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत पालकांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या सांगण्यावरून मुलीचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. तरुणी वर्षभरापूर्वी गावात राहणारा प्रियकर राहुलसोबत पळून गेली होती. राहुलच्या ताब्यातून मुलीला सोडवल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. राहुल सध्या तुरुंगात आहे.

    अपहरण प्रकरणात साक्ष देण्यासाठी न्यायालयात 26 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती. अपहरण प्रकरणाच्या समर्थनार्थ पालकांनी मुलीला तिचे म्हणणे रेकॉर्ड करण्यास सांगितले होते; परंतु, तिने राहुलच्या विरोधात जबाब नोंदवण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी तिची हत्या केली.