
घरी आईस्क्रीम बनवताना जर तुमच्याकडे शिवाय नसेल तर फॅनचा वापर करुन आईस्क्रीम कशी बनवायची हे या व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे.
उन्हाळा सुरू झाला की अनेक लोकं जागोजागी थंड पेय, आईस्क्रीम खाताना हमखास दिसतात. काही हौशी लोकं घरीही असे पेय, आईस्क्रीम तयार करतात. पण आईस्क्रीम घरी बनवायची म्हण्टंल की फ्रिजची गरज असते. आणि तो नसेल तर…तरीही तुम्ही आईस्क्रीम तयार करु शकता. सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हायरल व्हिडिओनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये एक महिला विना फ्रिजच्या आईस्क्रीम (Ice cream Viral Video) तयार करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हा व्हिडिओ शेयर करत महिलेचं कौतुकही केलं आहे.
फ्रीज शिवाय घरी बनवा आईस्क्रीम
घरी आईस्क्रीम बनवताना जर तुमच्याकडे फ्रिज नसेल तर फॅनचा वापर करुन आईस्क्रीम कशी बनवायची हे या व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे, ज्यांना फ्रिज शिवाय आईस्क्रीम बनवायचं आहे.
या व्हिडिओमध्ये एक महिला आईस्क्रीम बनवतााना प्रथम एका मोठ्या भांड्यात आईस्क्रीमसाठी आवश्यत असलेलं साहित्य सगळं निट मिक्स करुण घेते. एका भाड्ंयात ओतते. त्यानंतर स्टूलवर ठेवलेल्या स्टीलच्या डब्याच्या मध्यभागी ठेवते आणि त्याभोवती बर्फ ठेवते. यानंतर छताच्या पंख्याला बांधलेली दोरी डोलचीच्या हँडलला बांधून ती पंखा चालू करते. पंख्याच्या वेगानुसार डोलू बर्फाच्या मधोमध डब्यात फिरू लागतो. यामुळे हळूहळू आइस्क्रीमचे मिश्रण घट्ट होते. काही वेळाने ती महिला एका भांड्यातुनत आईस्क्रीम काढते आणि सर्व्ह करते. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी 29 मार्च रोजी ट्विटरवर पोस्ट केला होता आणि लिहिले होते जिथे इच्छा असते, तिथे मार्ग असतो…. हाताने बनवलेले आणि पंख्याने बनवलेले आइस्क्रीम. फक्त भारतात.
बघा व्हिडिओ
Where there’s a will, there’s a way.
Hand-made & Fan-made ice cream. Only in India… pic.twitter.com/NhZd3Fu2NX— anand mahindra (@anandmahindra) March 29, 2023
या व्हिडिओला आतापर्यंत 12 लाखांहून अधिक व्ह्यूज, 52 हजारांहून अधिक लाईक्स आणि 5736 रिट्विट्स मिळाले आहेत. यावर शेकडो युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले – देसी दर्जेदार, दुसऱ्याने याला अप्रतिम जुगाड म्हटले आणि अनेकांनी जगातील सर्वोत्तम आणि शुद्ध आइस्क्रीम असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे काही युझर्स म्हणत आहेत की, हे फक्त भारतातच शक्य आहे.