अनिल अंबानींची कंपनी मुकेश अंबानी खरेदी करणार, NCLTची मंजूरी

नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच रिलायन्स जिओ कंपनीने अनिल अंबानी यांची रिलायन्स इन्फ्राटेल विकत घेण्यासाठी नॅशनल कंपली लॉ ट्रिब्युनलशी संपर्क साधला होता. ६ नोव्हेंबरला जिओने RITL खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एस्क्रो खात्यात ३,७२० कोटी रुपये जमा करण्याची ऑफर दिली होती.

    नवी दिल्ली – उद्योगपती अनिल अंबानी यांच्या संकटाच्या काळात त्यांचे भाऊ मुकेश अंबानी यांनी धाव घेतली आहे. कारण उद्योगपती अनिल अंबानी सद्यस्थितीत कर्जबाजारी झालेले आहेत. त्यांची रिलायन्स इन्फ्राटेल (RITL) कंपनी विक्री करण्याच्या मार्गावर येवून पोहोचली आहे. या कंपनीला त्यांचे मोठे बंधू उद्योगपती मुकेश अंबानी हे खरेदी करणार आहे.

    रिलायन्स जिओ ही कंपनी रिलायन्स इंन्फ्राटेलला खरेदी करणार आहे. यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT) सोमवारी रिलायन्स जिओला रिलायन्स इन्फ्राटेलच्या अधिग्रहणासाठी मंजूरी दिली आहे. NCLT ने रिलायन्स जिओला RCom चे टॉवर आणि फायबर मालमत्तांचे संपादन करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) एस्क्रो खात्यात ३,७२० कोटी रुपये जमा करण्यास सांगितले आहेत.

    नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच रिलायन्स जिओ कंपनीने अनिल अंबानी यांची रिलायन्स इन्फ्राटेल विकत घेण्यासाठी नॅशनल कंपली लॉ ट्रिब्युनलशी संपर्क साधला होता. ६ नोव्हेंबरला जिओने RITL खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एस्क्रो खात्यात ३,७२० कोटी रुपये जमा करण्याची ऑफर दिली होती.

    अनिल अंबानीं यांची RITL कंपनी सद्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०१९ मध्ये जिओने ही कंपनी विकत घेण्यासाठी ३,७२० कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र, कर्जदारांच्या समितीने ४ मार्च २०२० रोजीच जिओच्या रिझोल्यूशन प्लॅनला मंजूरी दिली होती.