anil chauhan

लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) (Anil Chauhan) यांची संरक्षण दल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चौहान २०२१ साली लष्करातून निवृत्त झालेले आहेत.

    दिल्ली : देशाचे माजी संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांचा नऊ महिन्यांपूर्वी विमान अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून संरक्षण दलप्रमुख हे पद रिक्त होते. आता लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) (Anil Chauhan) यांची संरक्षण दल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चौहान २०२१ साली लष्करातून निवृत्त झालेले आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची देशाचे दुसरे संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

    लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांचा जन्म १८ मे १९६१ रोजी झाला. त्यांच्याकडे १९८१ लाव ११ गोरखा रायफल्सची जबाबदारी होती. नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथून त्यांनी लष्करी शिक्षण घेतले. त्यांनी मेजर जनरल पदावर अताना बारामुला भागात इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले होते.

    याआधी तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण दल प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) जनरल बिपिन रावत यांची ३० डिसेंबर २०१९ रोजी निवड करण्यात आली होती.