समुद्रात सापडलं आणखी एक हडप्पा-मेहंजदडो, 15,000 वर्षांपूर्वी वसलं होतं जगातील सगळ्यात प्राचीन शहर, समुद्रात मिळाले संस्कृतीचे अवशेष, का मिळाली शहराला जलसमाधी?

समुद्राच्या आत 50 ते 100 मीटर खोल दबलेल्या एका प्राचीन नगरीचे अवशेष प्राप्त झाल्याचं या संशोधकांचं म्हणणंय. ही जलसमाधी मिळालेली नगरी मइलादुथरई जिल्ह्याच्या पुप्मूहार या समुद्र किनाऱ्यापासून 30 ते 40 किमी अंतरावर असल्याचंही संशोधकांचं म्हणणंय. त्यांनी दावा केला आहे की, हे शहर 15 हजार वर्षांपूर्वी वसलं होतं.

    चैन्नई– भारताची (India) परंपरा प्राचीन आहे, हे आपल्याला माहिती आहेच. या देशाला हजारो वर्षांची परंपरा, प्रथा आणि संस्कृती असल्याचं आपण नेहमीच अभिमानानं सांगत आलेलो आहोत. या अभिमानात भर टाकणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. तामिळनाडू (Tamilnadu) राज्यातील मलियादुथुरई या जिल्ह्यात समु्द्राच्या (Sea) आत बंदर असलेलं एक शहर असल्याचं संशोधनात आढळून आलेलं आहे. त्रिचीमध्ये असलेल्या भारतीदासन युनिव्हर्सिटीच्या रिमोट सेन्सिंग विभागाच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. समुद्राच्या आत 50 ते 100 मीटर खोल दबलेल्या एका प्राचीन नगरीचे अवशेष प्राप्त झाल्याचं या संशोधकांचं म्हणणंय. ही जलसमाधी मिळालेली नगरी मइलादुथरई जिल्ह्याच्या पुप्मूहार या समुद्र किनाऱ्यापासून 30 ते 40 किमी अंतरावर असल्याचंही संशोधकांचं म्हणणंय. त्यांनी दावा केला आहे की, हे शहर 15 हजार वर्षांपूर्वी वसलं होतं. या शहराचा विस्तार 250 वर्ग किलोमीटर इतका मोठा असल्याचा दावाही करण्याच आलेला आहे. या शहरात विशाल बंदर, लाईट हाऊस म्हणजे दीपस्तंभ, जहाज, डॉकयार्ड्स आणि मानवी वसाहत होती, असं या संशोधकांचं म्हणणं आहे.

    कसं समोर आलं हे शहर ?

    या शहराच्या अभ्यासासाठी या संशोधकांनी सॅटेलाईट, महासागरांतील बाथीमेट्री चार्ट, मल्टी बीम इको साऊंडर डेटाचा उपोयग केल्याचं सांगण्यात येतंय. चैन्नईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियन टेक्नॉलॉजीनं ही सगळी माहिती एकत्रित जमा केली होती. या संशोधनात समुद्र किनारपट्टीचा परिसर आणि बंगालच्या खाडीच्या १००० वर्ग किलोमीटर परिसरातील क्षेत्राचा समावेश करण्यात आला होता.

    पुन्हा पुन्हा जलसमाधी घेणारं आणि नव्यानं वसणार शहर

    पुम्पूहार हे शहर 2500 वर्ष जुनं शहर असल्याचा दावा, या संशोधनानं खोडून काढलेला आहे. या संशोधनापूर्वी ही मान्यता होती. मात्र या संशोधनाच्या आधारावर हे शहर किमान 15000 पेक्षाही अधिक जुनं शहर असल्याचं सिद्ध करण्यात आलंय. पुम्पूहार हे जगातील सर्वात प्राचीन शहर असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. जे शहर अनेकदा समुद्रात बुडालं आणि पुन्हा नव्यानी वसलं असं हे एकमेक अनोखं शहर असण्याची शक्यता या संशोधकांनी वर्तवलेली आहे.

    काय होतं या 15000 वर्षांपूर्वीच्या शहराचं नाव ?

    पुम्पूहार या शहराची ओळख कावेरीपूमपट्टिनम या नावानेही आहे. हे शहर अनेक वर्षांपूर्वी समुद्रात बुडाल्याचं सांगण्यात येतं. तामिळ महाकाव्य मणिमेकली यात या शहराच्या नावाचा उल्लेखही सापडतो. या सगळ्या संशोधन प्रकल्पाशी संबंधित असलेल्या प्राध्यापक रामासामी यांनी सांगितलं आहे की, बंदर असलेलं हे शहर अचानक समुद्रात गुप्त कसं झालं, याचं नेमहमीच अनेकांना गूढ राहिलेलं आहे.

    या बंदर असलेल्या शहरात काय काय होतं ?

    या शहराच्या अध्ययनात अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. कावेरीच्या तीन डेल्टा साखळ्यांची रचना यात सापडलेली आहे. जी समुद्रात 40 किमी अंतरापर्यंत पसरलेली होती. या शहरात मिठागरं, बॅक वॉटर, नद्या, प्राचीन तट असं सगळं असल्याचं अभ्यासात समोर आलंय.

    या शहराची लांबी 11 किमी इतकी मोठी होती तर 2.5 किमी वर्गापर्यंत या शहराचा विस्तार होता. असं अभ्यासातून स्पष्ट होतंय. विज्ञानाच्या अधारे हे शहर वसवण्यात आल्याचेही पुरावे सांगण्यात येतायेत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत असा या शहराचा विस्तार होता. या शहरात जहाजांच्या जाण्या येण्यासाठी अनेक कालव्यांची रचना होती, असंही समोर आलेलं आहे. त्याची काही चिन्हंही सापडलेली आहेत. मध्यमध्ये मोठमोठी पठारं आहेत. ज्याचा उपयोग माल उतरवण्यसाठी होत असल्याची शक्यता आहे. या मालांची साठवणूकही या ठिकाणी होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

    कसं बुडालं असेल हे शहर ?

    या बंदरात जहाजं सुरक्षित थांबवण्यासाठीच्या 70 ते 80 जागा होत्या, असं समोर आलंय. त्याला आता डॉक या नावानं संबोधण्यात येतं. यावरुन या शहराचा आणि बंदराचा विस्तार आपल्याला नक्की समजू शकेल. शहराच्या उत्तरेकडे 4 किमी अंतरावर मानवी वस्ती होती, याचेही अवशेष सापडले आहेत. ओळीनं अनेक घरांचं बांधकाम झालेलं असल्याची शक्यताही समोर आलेली आहे. उत्तरेकडे या बंदराच्या 10 किमी अंतरावर एक लाईटहाऊस असल्याचे पुरावेही सापडले आहेत. या दीपस्तंभावर जाण्यासाठी एक घुटाकार शिडी असल्याचंही सांगण्यात येतंय.

    अभ्यासानुसार पम्पूहार परिसरात सातत्यानं येणारा पूर, त्सुनामी, समुद्राचा जलस्तर वाढणे आणि चक्रीवादळाच्या स्थितीमुळं या शहारला पटका बसल्याचं मानण्यात येतंय. नैसर्गिक संकटामुळं या शहराचं अनेकदा पुनर्वसन करावं लागल्याचे पुरावेही आहेत. या शहराचं सातव्यांगा पुनर्वसन हे 2500 वर्षांपूर्वी करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. 1020 वर्षांपूर्वी जलस्तर वाढल्यानं शहर पूर्म जलमय झालं होतं, अशीही माहिती समोर आलीय.