राहुल गांधींच्या सुरक्षेवरून काँग्रेसला उत्तर; सुरक्षेचे नियम मोडले, वेळोवेळी सूचनाही दिल्या, सीआरपीएफची पत्राद्वारे कारणे स्पष्ट

काँग्रेसने गृहमंत्र्यांना पत्र लिहून राहुल गांधींची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर सीआरपीएफने काँग्रेसला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राहुल गांधींनी तीन वर्षात तब्बल ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले. या विषयी त्यांनी माहिती देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सुरक्षेवरून काँग्रेसने (Congress) सरकारला जाब विचारला. त्यावर राहुल गांधी यांनीच सुरक्षेचे नियम मोडले असल्याचे उत्तर गृह मंत्रालयाने दिले. तसेच, तीन वर्षांत तब्बल ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आणि त्यांना वेळोवेळी सूचनाही दिल्या होत्या, असा खुलासाही केला.

    भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे (Amit Shah) पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांना पत्र लिहून राहुल गांधींची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर सीआरपीएफने (CRPF) काँग्रेसला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राहुल गांधींनी तीन वर्षात तब्बल ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले. या विषयी त्यांनी माहिती देण्यात आली आहे.

    राहुल गांधीच्या सुरक्षाव्यवस्थेत कोणताही हलगर्जीपणा करण्यात आलेला नाही. राहुल गांधीच्या व्यवस्थेत कोणतीही कमतरता नाही. फक्त सुरक्षा मिळालेल्या व्यक्तीने सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दरम्यान, राहुल गांधी यात्रेत अनेकदा यात्रेत सुरक्षा कवच तोडून लोकांना भेटण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधीच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा देण्यात आलेल्य व्यक्तीला सीआरपीएफने दिलेल्या आदेशनुसार राज्य पोलीस, सुरक्षा यंत्रणेशी समन्वय साधत सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. गृहमंत्रालयाद्वारे तैनात सुरक्षेसंदर्भात राज्य सरकार आणि राहुल गांधी बरोबरच काँग्रेसलादेखील माहिती देण्यात आली आहे.