anurag thakur

काँग्रेस पक्ष (Congress PArty)गांधी परिवाराच्या बाहेर बघतच नाही. राहुल गांधींनी पदभार स्विकारला पण पश्चिम बंगालमध्ये एकही जागा जिंकू शकले नाहीत. प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशातली मोहीम हाती घेतली पण फक्त २ जागा जिंकल्या आणि डिपॉझिटही जप्त झालं. पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्या काँग्रेसच्या झालेल्या पराभवावरून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

    केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी आज काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे. पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्या काँग्रेसच्या झालेल्या पराभवावरून ठाकूर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस गांधी परिवाराच्या पलीकडे पाहतच नाही, असं म्हणत अनुराग ठाकूर (Anurag Thakur Comment About Congress) यांनी टीका केली आहे.

    माध्यमांशी बोलताना आज ठाकूर म्हणाले, काँग्रेस पक्ष गांधी परिवाराच्या बाहेर बघतच नाही. राहुल गांधींनी पदभार स्विकारला पण पश्चिम बंगालमध्ये एकही जागा जिंकू शकले नाहीत. प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशातली मोहीम हाती घेतली पण फक्त २ जागा जिंकल्या आणि डिपॉझिटही जप्त झालं. आता पुन्हा सोनिया गांधींनी पक्षाची धुरा आपल्या हाती घेतली आहे.

    “काँग्रेसमध्ये काय घडतंय आणि ते फक्त गांधी परिवारापुरतेच मर्यादित राहिलेले आहेत का हे प्रश्न अनेक वर्षांपासून अनुत्तरितच आहेत. काँग्रेसला त्यांची हीच कोडी उलगडलेली नाहीत.

    नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतला काँग्रेसचा पराभव धक्कादायक आणि दुखःदायक आहे, असं प्रतिपादन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज केलं. पुढचा मार्ग आणखी कठीण आहे, ज्यामध्ये पक्षाची निष्ठा, इच्छाशक्ती आणि प्रतिकाराची क्षमता पणाला लागणार असल्याचंही त्या म्हणाल्या. जी २३ नेत्यांच्या टीकेला कोणतंही उत्तर न देता सोनिया गांधींनी आपण आपल्या पक्षाची एकता टिकवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं.

    सोनिया गांधी म्हणाल्या की, पुढचा मार्ग आधीपेक्षाही कठीण असणार आहे. आपली निष्ठा, इच्छाशक्ती आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता या सगळ्याची आता परीक्षा असेल. आणि त्यासाठी आपल्या या विशाल संघटनेची एकता प्रत्येक पातळीवर टिकवून ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास मी सांगेन की मी ही एकता टिकवण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न करण्यास तयार आहे. काँग्रेसचं पुनरुज्जीवन ही फक्त आपल्यासाठीच महत्त्वाची गोष्ट नाहीये तर ते लोकशाही आणि आपल्या समाजासाठीही महत्त्वाचं आहे.