जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना लष्कराकडून अटक

बंडागममध्ये लष्कराने मोठी कारवाई करत लष्कर ए तोयबाच्या तीन दहशताद्यांना अटक केली आहे. (Army arrests three Lashkar e Toiba terrorists in Jammu and Kashmir) मोही दीन डार, आशिक हुसैन हाजम गुलाम  आणि ताहिर बिन अहमद अशी त्या तीन दहशतवाद्यांची नावं आहेत. बंडागम मधील खेरेया Jammu Kashmir bandgam kheriya) गावात काही दहशतवादी (terrorists) लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून (intelligence agencies) लष्कराला मिळाली होती.

    बंडागम : जम्मू कश्मीरमधील बंडागम (Jammu Kashmir bandgam) जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. बंडागममध्ये लष्कराने मोठी कारवाई करत लष्कर ए तोयबाच्या तीन दहशताद्यांना अटक केली आहे. (Army arrests three Lashkar e Toiba terrorists in Jammu and Kashmir) मोही दीन डार, आशिक हुसैन हाजम गुलाम  आणि ताहिर बिन अहमद अशी त्या तीन दहशतवाद्यांची नावं आहेत. बंडागम मधील खेरेया Jammu Kashmir bandgam kheriya) गावात काही दहशतवादी (terrorists) लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून (intelligence agencies) लष्कराला मिळाली होती. ही माहिती मिळताच लष्कराने छापे मारत कारवाई केली. या कारवाईत लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना लष्करानं अटक केली आहे.

    दरम्यान, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यात एक चीनी पिस्तूल, दोन काडतूसं, 22 हिंदुस्थानी बनावटीच्या बंदूका, एक मॅगझिन, एके 57 रायफल व स्फोटकांचं सामन तसेच एक बाईक जप्त करण्यात आली आहे. 53 राष्ट्रीय रायफल्स व केंद्रीय राखीव पोलीस दलाचाच जवानांनी कारवाई करत दहशतवाद्यांना अटक केली व लष्कर ए तोयबाच्या मोड्यूलचा भांडाफोड केला. अजून काही दहशतवादी लपले आहे का, याचा तपास लष्कराचे जवान करत आहेत.