Army Chief General Manoj Narwane visits Ladakh, reviews situation on shores of Lake Pangong

रेचिंग ला सह फॉरवर्ड भागांना भेट दिली. आपल्या सैन्याच्या तयारीबाबत जीओसी, फायर अँड फ्युरी कॉर्प्स आणि अन्य लोकल कमांडर्सनी त्यांना माहिती दिली.

दिल्ली : भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पूर्व लडाख सीमेवर चीन विरुद्ध संघर्षाची स्थिती काय असताना लडाख दौरा केला आहे. लष्करप्रमुख नरवणे यांनी सुरक्षा रेषा आणि पँगोंग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील परिस्थीतीचा आढावा घेतला आहे.

लष्करप्रमुख नरवणे आज सकाळी ८.३० वाजता ते लडाखच्या फॉरवर्ड भागामध्ये पोहोचले होते. यानंतर ते दिल्लीमध्ये पोहण्याची शक्यता आहे. त्यांनी रेचिंग ला सह फॉरवर्ड भागांना भेट दिली. आपल्या सैन्याच्या तयारीबाबत जीओसी, फायर अँड फ्युरी कॉर्प्स आणि अन्य लोकल कमांडर्सनी त्यांना माहिती दिली. चीनला भारताने प्रत्येक आघाडीवर जशास तसे उत्तर दिले आहे. दोन्ही बाजूचे जवळपास ५० हजार सैनिक इथे तैनात आहेत. दोन्ही देशांनी सर्व अत्याधुनिक शस्त्र सज्ज ठेवली आहेत.