indian army

दरवर्षी १५ जानेवारीला भारतीय सेना दिन (Army Day) साजरा केला जातो. भारतीय सेना दिनाच्या (Indian Army Day 2022) निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi) आणि भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.

    भारतीय सेना दिनाच्या (Indian Army Day 2022) निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi) आणि भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी भारतीय सैन्याचे कौतुकही केले आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सेना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, “भारतीय सेना दिनानिमित्त विशेषत: आमचे शूर सैनिक, दिग्गज जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय सैन्य आपल्या शौर्य आणि व्यावसायिकतेसाठी ओळखले जाते. राष्ट्रीय सुरक्षेसाठी भारतीय लष्कराच्या अमूल्य योगदानाला शब्द न्याय देऊ शकत नाहीत.”

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सोशल मीडियावर भारतीय सेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    राजनाथ सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भारतीय सेना दिनानिमित्त भारतीय लष्करातील सर्व जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा. देशाचे रक्षण करण्याच्या वचनबद्धतेसह अविरत काम करून आपल्या सैन्याने एक धाडसी आणि व्यावसायिक शक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. भारतीय लष्कराचा देशाला अभिमान आहे.”