सीबीआयचे पथक दारात येताच बड्या अधिकाऱ्याला धक्का; एक कोटी रोकड असलेली बॅग फेकली अन् नंतर इमारतीवरून मारली उडी

जवरीमल बिश्नोई यांच्या घरी 99 लाख रुपये रोकड आढळून आली. तर बिश्नोईंचे कुटुंबीय ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होते तिथे एक सीसीटीव्ही फूटेजही आढळून आले आहे. यात रोकड असलेली बॅग वरून खाली फेकल्याचं दिसून येतं.

गांधीनगर : देशात वाढती गुन्हेगारी (Crime in Rajkot) आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, यंत्रणाही कार्यरत असतात. याच चौकशीचा धसका एका बड्या अधिकाऱ्याने घेतला आणि तो राहत असलेल्या इमारतीवरून स्वत: उडी मारून जीवन संपवलं. तसेच आत्महत्येपूर्वी एक कोटी रोकड असलेली बॅग देखील फेकल्याचे समोर आले आहे.

‘डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड’चे सहसंचालक असलेल्या जवरीमल बिश्नोई यांनी आत्महत्या करून जीवन संपवलं. त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. जवरीमल हे बिकानेरचे रहिवासी होते. एका निर्यातदाराकडून 5 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी त्यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शुक्रवारी अटक केली होती. दुसऱ्याच दिवशी शनिवारी सीबीआयचे पथक चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले होते. अचानक जवरीमल बिश्नोई यांनी सीबीआयच्या पथकासमोर कार्यालयाच्या खिडकीतून उडी मारत आत्महत्या केली.

एक कोटीची रोकड फेकली

जवरीमल बिश्नोई यांच्या घरी 99 लाख रुपये रोकड आढळून आली. तर बिश्नोईंचे कुटुंबीय ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होते तिथे एक सीसीटीव्ही फूटेजही आढळून आले आहे. यात रोकड असलेली बॅग वरून खाली फेकल्याचं दिसून येतं.

कुटुंबियांचा सीबीआयवर गंभीर आरोप

बिश्नोई यांच्यावर अचानक झालेल्या कारवाईनंतर कुटुंबियांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या कुटुंबियांनी सीबीआयवर गंभीर आरोपही केले आहेत. सीबीआयच्या पथकाने बिश्नोईंविरोधात कट रचल्याचं आणि त्यांना मारल्याचं कुटुंबियांनी म्हटलंय.