पाच राज्यातील निवडणुका होताच, पट्रोल डिझेलचे भाव वाढले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा पट्रोल डिझेलचा भाव

निवडणुका झाल्यानंतर आता इंधनाचे दरवाढ होणार अशी शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून वर्तवण्यात येत होती. इतकेच नाही तर विरोधकांनीही प्रचारात हाच मुद्दा लावून धरत भाजपावर निशाणा साधला होता. त्यामुळे निवडणूक निकालानंतर पट्रोल डिझेलचे दर किती वाढतील याची चिंता सर्वसामान्य लोकांना होती. त्याप्रमाणे पट्रोल डिझेलच्या भावात वाढ होताना दिसत आहे.

    नवी दिल्ली : देशातील पाच राज्यातील निवडणुकांचा निकाला काल गुरुवारी लागला आहे. दरम्यान पाचपैकी चार राज्यात भाजपाने यश मिळवले आहे. निवडणुका झाल्यानंतर आता इंधनाचे दरवाढ होणार अशी शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून वर्तवण्यात येत होती. इतकेच नाही तर विरोधकांनीही प्रचारात हाच मुद्दा लावून धरत भाजपावर निशाणा साधला होता. त्यामुळे निवडणूक निकालानंतर पट्रोल डिझेलचे दर किती वाढतील याची चिंता सर्वसामान्य लोकांना होती. त्याप्रमाणे पट्रोल डिझेलच्या भावात वाढ होताना दिसत आहे.

    दरम्यान, तेल कंपन्या या दराचा आढावा घेत पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित करते. इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या दररोज सकाळी विविध शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट करत असतात. IOCL नुसार, मुंबईत १०९.९८ रुपये प्रति लीटर पेट्रोल तर डिझेल ९४.१४ रुपये प्रति लीटर दर आहेत. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये प्रति लीटर, डिझेल ८६.६७ रुपये आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८९.७९ रुपये मिळत आहे. तर चेन्नईत एक लीटर पेट्रोलचे दर १०१.४० रुपये तर डिझेलची किंमत ९१.४३ रुपये प्रति लीटर आहेत. नोएडा येथे ९५.५१ रुपये पेट्रोल आणि ८७.०१ रुपये डिझेलचे दर आहेत. त्यामुळं पट्रोल डिझेलमध्ये दरवाढ थोडीफार होताना दिसत आहे.

    मागील १४ दिवसांपासून रशिया-यूक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचे जागतिक परिणाम पाहायला मिळत आहेत. देश-परदेशातील अनेक वस्तू महागल्या आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. पुढील काळात त्याचे परिणाम भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात होऊ शकतात. याठिकाणीही इंधन दरवाढ होऊ शकते असं बोललं जात आहे. जागतिक बाजारात क्रूड ऑयलच्या किमतीवर पेट्रोल-डिझेलची किंमत दरदिवशी बदलत असते. पण आगामी काळात आणखी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते, असं तज्ज्ञांनी म्हटले आहे.