इंदूरचं अशोक चक्र, राजस्थानचं मार्बल,नागपूरवरून आलं सागवान… जाणून घ्या नवीन संसदेसाठी कोणत्या राज्यातून आलं कोणत्या गोष्टी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) उद्या संसदेच्या नवीन इमारतीचे (New Parliament Building) उद्घाटन करणार आहेत. या चार मजली सुंदर इमारतीच्या भव्यतेची झलक दाखवणापा व्हिडिओ पंतप्रधानांनी (New Parliament Building Video) नुकतचं सोशल मिडियावर शेयर केला आहे.  एक भारत श्रेष्ठ भारताच्या खऱ्या भावनेचे दर्शन घडवणाऱ्या या संसदेच्या उभारणीसाठी देशभरातून साहित्य मागवण्यात आले. जाणून घ्या कोणत्या राज्यातून काय साहित्य आणण्यात आलं

    संसदेच्या नव्या इमारतीमध्ये देशाच्या विविध भागांतील शिल्प आणि कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. याशिवाय गरुड, गज, अश्व आणि मगर यासह देशात पूजल्या जाणाऱ्या प्राण्यांची झलकही दाखवण्यात येणार आहे. याशिवाय इमारतीत तीन दरवाजे बनवण्यात आले असून, त्यांना ज्ञानद्वार, शक्ती द्वार आणि कर्मद्वार अशी नावे देण्यात आली आहेत. भारताच्या आधुनिक होण्यापर्यंतच्या प्रवासाची झलकही या इमारतीत पाहायला मिळणार आहे.

    पंतप्रधानानी शेयर केला व्हिडिओ

    नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी कोणत्या राज्यातून कोणत्या साहित्य आणलं

    नव्या संसदेत वापरले जाणारे सागवान लाकूड नागपुरातून आणण्यात आले.

    – राजस्थानच्या सर्मथुरा येथील सँडस्टोन (लाल आणि पांढरा) वापरण्यात आला आहे.

    – याच्या मजल्यावर यूपीच्या मिर्झापूरचे कार्पेट बसवण्यात आले आहे.

    आगरतळा येथून आयात केलेले बांबूचे लाकूड त्याच्या मजल्यावर बसवण्यात आले आहे.

    – राजस्थानच्या राजनगर आणि नोएडा येथून दगडी जाळीचे काम लावण्यात आले.

    अशोक प्रतीकला महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि जयपूर येथून आणले होते.

    संसदेत बसवलेले अशोक चक्र इंदूरहून आणण्यात आले आहे.

    याशिवाय काही फर्निचर मुंबईहून आणले होते.

    लाख लाल जैसलमेरहून मागवले होते.

    – राजस्थानमधील अंबाजी येथून अंबाजी पांढरा मार्बल खरेदी करण्यात आला होता.

    – भगवा हिरवा दगड उदयपूरहून आणला होता.

    – दगड कोरण्याचे काम अबू रोड आणि उदयपूर येथून घेण्यात आले.

    राजस्थानमधील कोतपुतली येथूनही काही दगड आणले होते.

    – चक्री दादरी, हरियाणा येथून एम-वाळू, एनसीआर, हरियाणा आणि यूपी येथून फ्लाय अॅश ब्रिक्स खरेदी करण्यात आली.

    ब्रास वर्क आणि प्री-कास्ट ट्रेंच अहमदाबादमधून तर LS/RS फॉल्स सीलिंग स्टील स्ट्रक्चर दमण आणि दीवमधून आणले गेले.

    19 पक्षांचा उद्घाटनावर बहिष्कार

    उद्या होणाऱ्या या उद्घाटन समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. आम आदमी पार्टी, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा, तृणमूल काँग्रेस, राषअट्रीय जनता दल यासह अनेक पक्ष या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहेत. संसद भवनाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन न करणे, राष्ट्रपतींना समारंभासाठी आमंत्रित न करणे हा देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दुसरीकडे भाजपचे म्हणणे आहे की, सभापती हे संसदेचे संरक्षक आहेत आणि त्यांनी पंतप्रधानांना निमंत्रित केले आहे. या मुद्द्यावर राजकारण करू नये.