ज्ञानवापी प्रकरणात एएसआयने न्यायालयात सादर केला सर्वेक्षण अहवाल, २१ डिसेंबरला होणार निर्णय

ज्ञानवापी प्रकरणात, एएसआयच्या अतिरिक्त संचालकांनी वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांना सीलबंद अहवाल सादर केला आहे. हा अहवाल 1500 पेक्षा जास्त पानांचा आहे. ज्यामध्ये 250 हून अधिक पुरावे सादर करण्यात आले आहेत.

    वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. ए.के. विश्वेश ज्ञानवापी प्रकरणात एएसआयने सादर केलेल्या अहवालावर सुनावणी करत आहे. अहवाल सार्वजनिक करावा, असे हिंदू पक्षाचे वकील सांगत आहेत. आता याबाबतचा निर्णय २१ डिसेंबरला येणार आहे. ती सार्वजनिक करू नये, असे मुस्लिम बाजूचे म्हणणे आहे.