आसामच्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये बिबट्याची दहशत,  बिबट्याने इमारतीच्या कुंपणावरून झेप घेतली अन्…; 13 जण जखमी

पोलिसांनी सांगितले की, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट जोरहाटच्या सीमेवर आहे. त्याच्या कॅम्पसला लागूनच जंगल आहे. येथून बिबट्या आवारात घुसला होता. कर्मचाऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली होती. यानंतर त्याला पकडण्यासाठी पोहोचलेल्या टीमवर बिबट्याने हल्ला केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

    नवी दिल्ली – आसाममधील जोरहाटमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन वन कर्मचाऱ्यांसह 13 जण जखमी झाले आहेत. येथील रेन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट (RFRI) कॅम्पसमध्ये बिबट्याने दहशत निर्माण केल्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो सीमा भिंत वरून उडीमारुण चालत्या व्हॅनवर हल्ला करताना दिसत आहे. मात्र, वाहनाच्या काचा बंद असल्याने आत बसलेल्या लोकांना कोणतीही हानी झाली नाही.

    पोलिसांनी सांगितले की, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट जोरहाटच्या सीमेवर आहे. त्याच्या कॅम्पसला लागूनच जंगल आहे. येथून बिबट्या आवारात घुसला होता. कर्मचाऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली होती. यानंतर त्याला पकडण्यासाठी पोहोचलेल्या टीमवर बिबट्याने हल्ला केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

    अद्यापपर्यंत बिबट्या पकडला नसल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगतात. आजूबाजूच्या लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अतिरिक्त बचाव पथकही परिसरात तैनात करण्यात आले आहे. यासोबतच वन संशोधन संस्थेच्या परिसरातही दक्षता वाढवण्यात आली आहे.