आजच किसान क्रेडिट कार्ड (KCC) बनवा आणि मिळवा मोठा फायदा; चार टक्के व्याजावर 3 लाखांपर्यंतचे मिळतेय कर्ज

किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म PMkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामध्ये बँका केवळ ३ कागदपत्रे घेऊन कर्ज देऊ शकतात, अशी स्पष्ट सूचना आहे. केसीसी बनविण्यासाठी शेतकऱ्याला आधार कार्ड, पॅनकार्ड आणि फोटो आवश्यक असतील. तसेच प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल, ज्यामध्ये आपण इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही, असे सांगावे लागेल.

  नवी दिल्ली : ‘किसान सन्मान निधी’ शिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी सरकारकडून स्वस्त दरात कर्जदेखील दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार सहजपणे शेतीसाठी कर्ज मिळते. आपण शेतकरी असल्यास आपण केसीसी योजनेचा लाभ घेऊ शकता.

  किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म PMkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामध्ये बँका केवळ ३ कागदपत्रे घेऊन कर्ज देऊ शकतात, अशी स्पष्ट सूचना आहे. केसीसी बनविण्यासाठी शेतकऱ्याला आधार कार्ड, पॅनकार्ड आणि फोटो आवश्यक असतील. तसेच प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल, ज्यामध्ये आपण इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही, असे सांगावे लागेल.

  तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर तुम्ही सहकारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ इंडिया आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) वर संपर्क साधू शकता.

  किसान क्रेडिट कार्डची वैधता ५ वर्ष आहे. या कार्डवर शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची कर्ज दिले जाते. तसेच शेतीसाठी कर्जे सुमारे ९ टक्के व्याज दराने उपलब्ध आहेत. परंतु केसीसीवर सरकार शेतकऱ्यांना दोन टक्के अनुदान देते आणि केसीसीच्या वेळेवर भरणा केल्यास ३ टक्के अतिरिक्त सूट दिली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांचा व्याजदर ४ टक्के आहे.

  शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. यासाठी शेतकर्‍याची स्वतःची जमीन असावी. जमीन तारण न ठेवता शेतकरी 3 लाख रुपयांच्या क्रेडिट कार्डवर कर्ज घेऊ शकतो. केसीसी पाच वर्षांसाठी वैध आहे.

  शेतकर्‍यांच्या हिताचे मोठे पाऊल उचलून सरकारने केसीसीमधील व्याज दरामध्ये २०१९ मध्ये पशुधन आणि मच्छीमारांसह दुग्ध उद्योगांना आर्थिक मदत देण्याची तरतूद केली. किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना १९९८ मध्ये सुरू केली गेली. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार सहजपणे शेतीसाठी कर्ज मिळते. या क्रेडिट कार्डच्या प्रमाणात, शेतकरी आपला शेतीमाल, खते, बियाणे, कीटकनाशके विकत घेऊ शकतात.

  at 4 percent interest rate loan up to rs 3 lakh make kisan credit card today and get huge profit