‘या’ 5 राज्यांतील विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियात बंदी; विद्यापीठांनी प्रवेश नाकारला, कारण ऐकून तुम्हीही चक्रावुन जाणार

पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  नुकतचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ऑस्ट्रेलियाला (Australia) भेट दिली होती. यावेळी त्यांनी 20000 भारतीयांशी संवाद साधला होता. मात्र, आता त्याच ऑस्ट्रेलियातुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियातील अनेक विद्यापीठांनी भारतातील 4 राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशमधील  विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र सिडनी मॉर्निंग हेराल्डनुसार, ऑस्ट्रेलियाच्या दोन प्रमुख विद्यापीठांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या शिक्षण प्रतिनिधींना पत्र लिहिले. यामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  नेमकं कारण काय?

  ऑस्ट्रेलियाचे गृहविभाग काश्मीरसह या चार राज्यांतील विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज सातत्याने नाकारत आहे. गेल्या महिन्यात 4 ऑस्ट्रेलियन विद्यापीठांनी भारतीय विद्यार्थ्यांवर विद्यार्थी व्हिसाचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक स्टुडंट व्हिसा घेऊन अभ्यास करण्यासाठी येतात आणि नोकरीसाठी करतात.

  चार पैकी एक स्टुडंट व्हिसा फ्रॅाड

  ऑस्ट्रेलियाच्या गृहविभागाच्या असं निदर्शनास आले आहे की, भारतातून येणाऱा प्रत्येक 4 विद्यार्थी व्हिसा अर्जांपैकी 1 हा फ्रॅाड असतो. यामुळे, ऑस्ट्रेलियातील अभ्यासासाठी अर्ज नाकारण्याचे प्रमाण देखील 24.3% पर्यंत वाढले आहे. जो गेल्या 13 वर्षांतील उच्चांक आहे. वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की 2022 मध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, परंतु त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं. विद्यापीठाने एजंटांना सांगितले की, हे करणारे बहुतेक विद्यार्थी पंजाब, गुजरात आणि हरियाणातील आहेत. या राज्यांतील विद्यार्थ्यांवरील बंदी जूनपर्यंत कायम राहणार आहे.

  पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रेलिया दौरा

  ऑस्ट्रेलियातुन आलेल्या या बातमीने भारतात सध्या खळबळ उडाली असुन ऑस्ट्रेलिया शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांची यामुळे चिंता वाढली आहे.  ऑस्ट्रेलियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी बुधवारी भारतात परतले असताना ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांवरील बंदीचा मुद्दा तापला आहे. सिडनीमध्ये 20,000 लोकांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले होते की विद्यार्थी दोन्ही देशांना जवळ आणत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकमेकांच्या शैक्षणिक पदव्या ओळखण्यासाठी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.