स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात लाल किल्ल्यावरून महिला शक्तीचा जागर!

महिलांचा अनादर थांबवा आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा अनादर थांबवण्याची शपथ घेण्याचा आग्रह देशवासियांना केला.

    नवी दिल्ली : आज देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. याचं औचित्य साधून देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. यावेळी लाल किल्ल्यावरून त्यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी मोदींनी देशातील महिलाशक्तीचा गौरव केला. खेळापासून युद्धभूमीपर्यंत महिलांच्या योगदानाचं यावेळी त्यांनी कौतुक केलं. नारीशक्तीचा कधीच अनादर करणार नाही, अशी प्रतिज्ञाच घेण्याचं त्यांनी देशवासियांनी आवाहन केलं.

    आज देश स्वातंत्र्याची (Independence Day) पंचाहत्तरी साजरी करत आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amtrut Mahotsav) देशभर साजरा होत आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. अश्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. “महिलांचा सन्मान होणं. त्याची सुरक्षा महत्वाची आहे. त्याची काळजी घेणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. स्वातंत्र्यदिनी एक संकल्प करुया, महिलांचा आदर करुयात”, असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं

    महिलांचा अनादर थांबवा आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा अनादर थांबवण्याची शपथ घेण्याचा आग्रह देशवासियांना केला. शिक्षण असो की विज्ञान, देशातील महिला अव्वल आहेत. क्रीडा असो वा रणांगण, भारतातील महिला नव्या क्षमतेने आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. येत्या 25 वर्षात महिलांचे मोठे योगदान मला दिसत आहे. 75 वर्षांच्या प्रवासात त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध आपल्याला सर्व शक्तीनिशी लढायचे आहे, असे ते म्हणाले.