बाबा बालकनाथ बनणार मंत्री?; राजस्थानमध्ये लवकरच होणार मंत्रिमंडळ विस्तार

राजस्थानमध्ये भजनलाल सरकार लवकरच आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे. मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये तरुण आणि अनुभवी नेत्यांचे मिश्रण असेल.

    जयपूर : राजस्थानमध्ये भजनलाल सरकार लवकरच आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे. मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये तरुण आणि अनुभवी नेत्यांचे मिश्रण असेल. प्रथमच आमदार भजनलाल शर्मा यांनी या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री म्हणून तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

    राजस्थानमध्ये 200 विधानसभेच्या जागा आहेत. त्यात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 30 मंत्री असू शकतात, असे बोलले जात आहे. सुत्रानुसार, मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार सोमवारी किंवा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. सुमारे 15 आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

    मंत्रिमंडळात तरुण आणि अनुभवी आमदारांचा समावेश अपेक्षित आहे. या मंत्रिमंडळात बाबा बालकनाथ, शैलेश सिंह, नौक्षम चौधरी, संदीप शर्मा, जवाहर सिंग बेदम आणि महंत प्रताप पुरी यांचा कॅबिनेटमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शर्मा यांनी अलीकडेच भाजपा अध्यक्ष नड्डा, अमित शहा यांची भेट घेतली होती.