‘अयोध्येतील राम मंदिराजागी पुन्हा बाबरी मशीद बांधू’ अल कायदानं दिली धमकी, भारतीय मुस्लिमांना केलं हे’ आवाहन

'बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर बांधलं जात आहे. ते लवकरच पाडलं जाईल आणि मूर्तींऐवजी अल्लाहची बाबरी मशीद बांधली जाईल.

    1 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतलं राम मंदिरांच (Ram Mandir) बांधकाम पुर्ण होणार असल्याचं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच जाहीर केलं. आता या संबधात एक मोठी बातमी समोर येत आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेनं राम मंदिर पाडून त्या जागी मशीद बांधण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.

    गझवा-ए-हिंद या नियतकालिकाच्या ताज्या अंकात याबाबत माहिती प्रकाशित झाली आहे. याशिवाय जिहादी फीडच्या वतीने या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या ऑनलाइन मासिकामध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वक्तव्य करण्यात आलं आहे. भारतीय मुस्लिमांनी जिहादला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

    माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 110 पानांच्या संपादकीय लेखामध्ये म्हटलं आहे की, ‘बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर बांधलं जात आहे. ते लवकरच पाडलं जाईल आणि मूर्तींऐवजी अल्लाहची बाबरी मशीद बांधली जाईल. संपादकीय लेखातला मजकूर भारतीय वातावरणाशी परिचित असलेल्या व्यक्तीनं लिहिलेला वाटतो. असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.