balenciaga bag

बॅलेन्सियागा (Balenciaga’s) ची कचऱ्याची पिशवी सध्या काळा, निळा व पांढरा या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार ही पिशवी बनवण्यासाठी चक्क वेगळ्या प्रकरच्या calfskin चामड्याचा उपयोग करण्यात आला आहे.

    बॅलेन्सियागा (Balenciaga’s) या ब्रँडने एक हटके बॅग लाँच केली आहे. बॅलेन्सियागा (Balenciaga’s) ने विंटर २२ कलेक्शनमध्ये एक कचऱ्याची पिशवी सादर केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पिशवीची किंमत तब्बल १ लाख ४० हजार इतकी आहे.

    इतक्या महाग कचऱ्याच्या बॅगमध्ये नक्की काय आहे ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ट्विटर वर अनेकांनी या कचऱ्याच्या पिशवीवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. मात्र कंपनीच्या मते ही साधी कचऱ्याची पिशवी नसून यात अनेक खास गोष्टी आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार बॅलेन्सियागा (Balenciaga’s) ची कचऱ्याची पिशवी सध्या काळा, निळा व पांढरा या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार ही पिशवी बनवण्यासाठी चक्क वेगळ्या प्रकरच्या calfskin चामड्याचा उपयोग करण्यात आला आहे. या बॅगवर कंपनीचा लोगो दिसत आहे. या लोगोमुळेच पिशवी खरेदी केली जात आहे.

    बॅलेन्सियागा (Balenciaga) ही कंपनी मुळात सर्वसामान्य दिसणाऱ्या वस्तू महागात विकण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी त्यांनी एक रंग उडालेला स्वेटर तब्बल १ लाख १८ हजार ३६० रुपयात लाँच केला होता. या निळ्या स्वेटरचे अनेक धागे निघाले होते. मात्र या स्वेटरसाठी चांगली लोकर वापरण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.